Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यडॉक्टर हेडगेवार : आदरांजली

डॉक्टर हेडगेवार : आदरांजली

विश्वगुरू होईल भारती………
हरि:ओम…..!
नर्मदे हर…..!
सादर स्नेह वंदन….!
सुजनहो आज दिनांक 21 जून………

आजचा दिवस गेल्या काही वर्षापासून म्हणजेच, प्रधान सेवक श्री नरेंद्रजी मोदी यांनी माँ भारती चे प्रधानमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण विश्वाने आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावयास सुरुवात केली आहे. आपणा सर्वास आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…….!

त्याचबरोबर आज दिनांक 21 जून म्हणजे माँ भारतीच्या सेवेसाठी आजन्म कटिबद्ध असलेल्या  “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” या जगातील एकमेव राष्ट्र समर्पित व स्वार्थ विरहित संघटनेचे संस्थापक  “परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार” यांची पुण्यतिथी…….!

पूजनीय डॉक्टरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्र समर्पित जीवनाचे एक अत्यंत आदर्श उदाहरण आहे. राष्ट्र निर्मितीचे ध्येय उरी जपणाऱ्या महापुरुषाची दृष्टी किती सूक्ष्म, उत्तुंग, व्यापक, सर्वगामी, स्वार्थ विरहीत व संस्कार संपन्न असते हे बघायचे असेल तर पूजनीय डॉक्टरांच्या जीवना सारखा दुसरा उत्तम मार्गदर्शक दिपस्तंभ नाही.

हे मी केवळ पूजनीय डॉक्टरांबद्दल वाटणाऱ्या श्रद्धेतून, आदरातून बोलत नसून, आज “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने” आपल्या निरलस, निस्वार्थ व राष्ट्र समर्पित सेवा भावनेने विश्व पटलावर जे स्थान निर्माण केलेले आहे त्याचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येक विचारवंताचे, अभ्यासकाचे हे अनुभव सिद्ध मत आहे.

परमपूजनीय डॉक्टरांनी 1925 मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. अवघ्या एका शतकाच्‍या आतच भारतीय संस्कृती, भारतीय दर्शन, भारतीय विचार व भारतीय समाजधारणा यांचा ध्यास घेऊन त्याचा सर्वंकष अभ्यास करून त्यातील गुणदोषांचा संम्यक विचार करून दोष विरहित, गुणसंपन्न, बलसंपन्न व ध्येय समर्पित कार्यकर्त्यांची एक देवदुर्लभ मांदियाळी पूजनीय डॉक्टरांनी उभारली, हेच त्यांचे अलौकिक वैशिष्ट्य आहे.

अन्यथा संस्था किंवा संघटना निर्माण करणाऱ्या महापुरुषाचा देहांत झाल्यानंतर ती संस्था किंवा संघटना लयाला जाते, नामशेष होते, आपल्या मूळ विचारापासून भरकटते हा सार्वत्रिक अनुभव आपणास बघावयास मिळतो. तथापि पूजनीय डॉक्टरांनी निर्माण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूळ स्त्रोत हा “इदं न मम, राष्ट्राय स्वाहा” हा असल्यामुळे सर्वप्रथम राष्ट्राचा विचार, नंतर पक्षाचा विचार आणि नंतर माझा विचार हा राष्ट्र केंद्रित, किंबहुना विश्व केंद्रित सुखाचा शाश्वत मार्ग राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुपाने, आज सर्व राष्ट्र सेवा करू इच्छिणाऱ्या नव तरुणांसाठी उपलब्ध आहे.

लवकरच संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष येणार आहे. म्हणून संघ अधिक मोठा वा अधिक व्यापक व्हावा, त्याचं स्वतःचं एक स्थान असावं असा संघाचा विचार आहे का ? तर मुळीच नाही…!

परमपूजनीय डॉक्टर म्हणायचे की एखाद्या व्यक्तीस वैद्याची किंवा डॉक्टरची गरज असणे हे त्याच्या अनारोग्याचे लक्षण आहे. आरोग्य सुदृढ असले आणि उत्तम असले तर जसे व्यक्तीला डॉक्टर कडे, चिकित्सकाकडे किंवा वैद्याकडे जावे लागत नाही तसाच समाज संस्कार संपन्न, बलसंपन्न, संघटित व राष्ट्र विचाराने भरलेला असला तर त्याच्या संघटनासाठी एखाद्या संस्थेची गरज भासत नाही. म्हणूनच पूजनीय डॉक्टरांनी संघाला अपेक्षित असलेले कार्य करणाऱ्या ईश्वरनिष्ठ कार्यकर्त्यांची देवदुर्लभ मांदियाळी समाज जीवनात निर्माण व्हावी व राष्ट्रभावना ही समाजाची
“स्वयंप्रेरणा” व्हावी या मूलभूत धारणेतून संघ लवकरात लवकर विसर्जित होऊन त्याचे काम थांबवावे अशी डॉक्टरांची मनीषा होती.

संघाच्या शताब्दी वर्षांमध्ये तरी आपण सारे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून माँ भारतीस “विश्वगुरू” बनवू या. कोणत्याही संघटनेशिवाय हा हिंदू समाज गुणदोष रहित बलसंपन्न व राष्ट्र समर्पित जीवन जगू शकतो हा एक नवा विश्वास विश्वामध्ये निर्माण करु या. केवळ माँ भारतीचीच सेवा करणे ही संघाची कल्पना नसून संपूर्ण विश्व हे आपले कुटुंब समजुन श्रेष्ठ मानव समाज निर्मितीसाठी आपण कटिबद्ध असावे असे डॉक्‍टरांचे स्वप्न होते.
“क्रुण्वंतो विश्वमार्यंच” या धारणेतून संघ कार्य सुरू झालेले आहे.

अशा या दिव्य, अलौकिक, स्वार्थ विरहित व देवदुर्लभ राष्ट्र भक्तांच्या संघटनेच्या क्रांत दृष्ट्या निर्मात्या युगपुरुषास आजच्या पुण्यतिथी दिनी मानाचा मुजरा……..! त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ध्येय पथावरील त्यांच्या पाऊल ठशांचा मागोवा घेत त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत इच्छित ध्येय प्राप्त करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना वाहिलेली आदरांजली होईल.

अशी आदरांजली वाहण्याची सर्वार्थाने क्षमता काया, वाचा, मने आम्हां सर्वांमध्ये निर्माण होवो अशी विश्वनियंत्याचे चरणी प्रार्थना …….!

परम पूजनीय डॉक्टरांचे पुण्य पावन स्मृतीस पुनश्च एकदा श्रद्धापूर्ण आदरांजली……!
कळावे, बहुत काय लिहिणे….?
………पायीची वहाण पायी बरी।।
आमुचे आगत्य असो द्यावे.

अक्षरयोगी

– लेखन : राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य,
ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज. अमळनेर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. डॉ. हेडगेवार यांना मनापासून श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?