मुंबईच्या वडाळा येथील पी. ई. एस. शिक्षण संस्थेच्या डॉ. आंबेडकर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात महाराष्ट्रदिन व कामगारदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. यशोधरा वराळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. एन.सी.सी. प्रमुख ए. एन. ओ. प्रा जी. एन. कुवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. कॅडेट्सने ड्रिल आणि प्रात्यक्षिके यांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यानंतर फ्लॅग एरिया सादरीकरण, नृत्य, सेक्शन अटॅक प्रात्यक्षिके यासारखे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.

या क्षणाचे औचित्य साधून एन. सी .सी .च्या सर्व विद्यार्थ्याननी वर्षभरात मिळविलेल्या विविध संपादणुकाबद्दल प्राचार्या डाॅ. यशोधरा वराळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व मेडल्स देऊन त्यांचा येथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कॉलेज मधील प्राध्यापक मंडळी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800