Monday, December 23, 2024
Homeबातम्याडॉ कोल्हे दांपत्याने जिंकली नवी मुंबई करांची मनं….

डॉ कोल्हे दांपत्याने जिंकली नवी मुंबई करांची मनं….

नवी मुंबईतील प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून गत दहा वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीव्याख्यान श्रृंखलेमध्ये यावर्षी अकरावे पुष्प गुंफण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांची श्री.महेंद्र कोंडे (जनसंपर्क अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका) यांनी घेतलेल्या मूलाखतीतून डॉ कोल्हे यांच्या सेवाकार्याचा प्रवास जाणून घेताना नवी मुंबईकर मंत्रमुग्ध झाले.
अतिशय सात्विक, मनमोकळ्या गप्पा झाल्याने उपस्थित सर्व नवी मुंबईकरांची मने कोल्हे दांपत्याने जिंकली आणि त्यांच्या बोलण्याला वेळोवेळी टाळ्यांचा गजर होत होता.

पुरस्कार प्रदान

प्रभात ट्रस्ट अवयवादान प्रचार प्रसारासाठीही कार्यरत आहे. यासाठी स्मृतीव्याख्यान कार्यक्रमामध्ये मृत्यूपश्चात अवयवदान केलेल्या कै.अरविंद मणीलाल गाला व कै. आशा मुरलीधर ओक यांच्या परिवारास अवयवदाता सन्मान मुंबईतील पहिली हॅन्ड ट्रान्सप्लांट झालेल्या मोनिका मोरे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच अवयदान क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर हाॅस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण व हिपॅटो पॅनक्रॅटिक बिलियरी (HPB) सर्जरी विभागाचे संचालक डॉ. विक्रम राऊत यांना स्टार ऑफ द इयर सन्मान प्रदान करण्यात आला. अवयवदानातून प्राप्त हातानी अवयवदान पुरस्कार संपन्न झाले.

तसेच संस्थेच्या कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीग्रंथालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मा.डॉ. नंदकिशोर मोतेवार, संचालक- ज्ञान स्त्रोत केंद्र, मुंबई विद्यापीठ यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी संकल्प तुला दानाचा सामाजिक परिवर्तनाचा या उपक्रमांतर्गत सुवर्ण महोत्सवी तुला संपन्न झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात ट्रस्ट चे प्रमुख डॉ प्रशांत थोरात यांनी केले. तर सूत्र संचालन कोमल यांनी केले.

कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, रॅमसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवानी, सीए इ ए पाटील, न्युज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ, साहित्य मंदिरचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी अशी सामाजिक, साहित्यिक राजकीय तसेच विविध स्तरातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी पुस्तक दालन, आनंदवन व प्रभात महिला बचत गट हस्त निर्मित वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

या कार्यक्रमात लग्न-हळदी कार्यक्रमासाठी जात्यावर दळलेली नैसर्गिक हळदीची निर्मिती महिला बचत गटद्वारे करण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आज मुंबईतील गिरगाव आंब्रोली चर्चमधे ” वंदना ” या गीतसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले. या गीतसंग्रहास ‘ गज आनन म्हात्रे ‘ यांची प्रस्तावना आहे.
    विजयानंद उजगरे ह्या नामांकित कवीचा हा गीतसंग्रह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९
गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७