डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक डॉ.भागवत जनार्धन कटारे यांना, नाराणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्रतिष्ठानचे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी ही माहिती नुकतीच दिली.
पुज्य नाराणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान (अंबाजोगाई) यांच्यावतीने शैक्षणिक अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीस अथवा संस्थेस अथवा समाजोपयोगी उपक्रमास नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने गौरविले जाते.
या वर्षी हा पुरस्कार अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.भागवत जनार्धन कटारे यांना देण्यात येणार आहे. डॉ.भागवत जनार्धन कटारे यांनी शिक्षण क्षेत्रासह सांस्कृतिक, सामाजिक व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
या पुरस्काराचे वितरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते येत्या ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मानवलोक (अंबाजोगाई) येथे होणार आहे.
ही निवड प्रतिष्ठानच्या त्रिसदस्यीय समितीने केली आहे. या त्रिसदस्यीय समितीत माजी कुलगुरू, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, ‘लातुर पॅटर्न’चे जनक प्राचार्य अनिरूद्ध जाधव, प्राचार्य प्रताप बोराडे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे असे आवाहन नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जी.जी.रांदड, उपाध्यक्ष प्रा.एस.के.जोगदंड व सचिव डॉ.नरेंद्र काळे, सहसचिव डॉ. नवनाथ घुगे, अनिकेत लोहिया, प्रताप पवार, विश्वास नरवाडे, अंगदराव तट, ॲड.चव्हाण जयसिंग, एस.बी.सय्यद, रजनी काळदाते यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.
– टीम एनएसटी, 9869484800
Nice to know. Hearty congratulations. Keep it up!!!!