Wednesday, June 18, 2025
Homeबातम्याडॉ. राणी खेडीकर यांची नियुक्ती

डॉ. राणी खेडीकर यांची नियुक्ती

महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून डॉ. राणी खेडीकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे बाल न्याय अधिनियम २०१५, १६ मधील कलम २७ च्या पोट-कलम एक महाराष्ट्र राज्य बाल न्याय अंतर्गत मुलांची काळजी व संरक्षण २०१८ च्या नियम १५ अन्वये शासनाने अधिसूचना जारी करुन पुणे जिल्हातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बाल रक्षण समितीला प्रदान करण्यात आली आहे. त्याकरता बाल कल्याण समिती असते. आता या समितीवर अध्यक्षा म्हणून डॉक्टर राणी दुष्यंत खेडीकर यांची नियुक्ती झाली आहे. पुणे भाग १ च्या अंतर्गत येणारा संपूर्ण झोन त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार आहे.

डॉक्टर राणी दुष्यंत खेडीकर यांची बाल कल्याण समितीवर नेमणूक म्हणजे त्यांनी समुपदेशक म्हणून जे काही सामाजिक कार्य केले आहे, त्या कार्याचा गौरवच आहे.

अल्प परिचय
डॉ राणी खेडीकर या गेली सतरा वर्षे, समाजात अभूतपूर्व असे कार्य करीत आहेत. हे सर्व करत असताना “वेश्या मातांची मुलं आणि समस्या” या विषयावर आचार्य पदवी (पीएचडी) मिळविणाऱ्या त्या पहिल्याच संशोधक आहेत. एक अभ्यासक म्हणून त्यांनी पीएचडी मिळवलीच पण संवेदनशील मनाच्या राणीजींनी या मुलांच्या शैक्षणिक विकासाकरता प्रत्यक्ष कार्य करायला सुरुवात केली. त्यांच्या कार्यावर आधारित ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण‘ हा कथासंग्रह आहे. ‘वेश्या वस्तीत जगत असताना निष्पाप मुलांच्या डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्न रंगत असतात. ती स्वप्न नेमकी कशी असतात. ती स्वप्न पूर्ण करताना वास्तव परिस्थितीशी त्यांना कसे झुंजावे लागते या सर्व कथा ह्या संग्रहात वाचकांसाठी खुल्या झाल्या आहेत.

डॉ राणी खेडीकर यांची आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर गेली ८ महिने दर गुरुवारी प्रसिध्द होणारी “लालबत्ती” ही लेखमाला भल्या भल्या वाचकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे.

आपले कार्य करत असताना डॉक्टर राणी खेडीकर यांनी समाजाला संवेदनशील बनविण्याच्या कामाला वाहून घेतले आहे. वेश्यांच्या बालकांचा विकास घडून यांना समाजप्रवाहात आणण्याचे कार्य त्या मिशन म्हणून पार पाडीत आहेत.

डॉ राणी खेडीकर या पुढील पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

1.सावित्री बाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, कर्नाटक राज्य.
2.राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य. राष्ट्रीय पुरस्कार गुजराथ
2.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे कर्तुत्ववान स्त्रियांचा सन्मान पुरस्कार
3.सावित्रीची लेक राज्य पुरस्कार
4 रोटरी क्लब सन्मान पुरस्कार
5.कमलाताई होस्पेट पुरस्कार
महाराष्ट्र लक्षवेधी पुरस्कार
6.नारीशक्ती पुरस्कार. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे

बाल कल्याण समितीच्या माध्यमातून बालकांच्या कल्याणाचे कार्य त्या नक्कीच यशस्वीपणे करतील.
डॉ राणी खेडीकर यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

ऍड रुपेश पवार

– लेखन : ऍड. रुपेश पवार.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. डाॅ.राणी खेडेकर यांचे सामाजिक कार्य पहाता त्यांना मिळालेले सन्मान व नियुक्ति योग्य ठरेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments