दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालंय. ते 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पुणे येथे कायम स्वरूपी वास्तव्य असलेले डॉ विश्वास मेहेंदळे मुंबईत मुलुंड येथे जावया कडे आलेले होते.
आज दुपारी त्यांच्या पार्थिवा वर, मुलुंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अल्प परिचय
डॉ विश्वास मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते.
काही काळ ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते.
सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे ते संस्थापक होते.
“लोकमान्य टिळकांचे अग्रलेख” या विषयवार त्यांनी पुणे विद्यापीठातून पी एचडी पदवी प्राप्त केली होती. ते 18 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.
१ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई दूरदर्शन केंद्राला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित होते.
त्यावेळी त्यांची तब्येत बरी होती. पण गेले काही दिवस तब्येत बिघडल्याने ते ८ दिवस द्रव पदार्थच घेत होते.
डॉ विश्वास मेहेंदळे सर यांचे सोबत मी दूरदर्शन मध्ये काम केले होते. त्यांचा स्वभाव अतिशय अभ्यासू, मिश्किल, परखड असा होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या अचानक जाण्याने माध्यम विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

– देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏💐
🙏ॐ शांती, सहृदय श्रद्धांजली
भावपूर्ण आदरांजली
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना…
डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या कर्तृत्वाला सलाम.
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
ओम शांती
भावपूर्ण श्रद्धांजली