भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका असा बहुमान प्राप्त युगस्त्री फातिमाबी शेख, यांच्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून पहिली पी.एच.डी मिळविल्याबद्दल
मालेगाव येथील डॉ सादिया मोहम्मद फारूकी यांचा फातिमाच्या लेकिंनी शुभेच्छा देण्यासाठी नुकतेच गुगल मीटवर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात शुभेच्छा देतांना कवयित्री प्रा अनिसा शेख यांनी युगस्त्री फातिमाबी शेख यांच्यावर पीएचडी करणाऱ्या डॉ.सादिया या पहिल्या महिला आहेत, त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगून पुणे येथे फातिमाबी शेख साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात अनिसा शेख यांनी फातिमाबी शेख यांच्यावर मुलींनी पीएचडी करावी, त्यांच्या नावे विद्यापीठ व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि आज ती प्राध्यापक सादिया यांच्यामुळे पूर्णत्वाला आली आहे असे सांगितले.
आम्ही फातिमाच्या लेकी साहित्यिक समूह, आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था व स्पंदन बहुभाषिय त्रैमासिकच्या वतीने डॉक्टर सादिया यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर दिलशाद सय्यद मॅडम यांनी मुस्लिम समाजात अजूनही स्त्री मागे आहे, उच्च शिक्षणासाठी तिला बाहेर पाठवले जात नाही पण सादिया यांना त्यांचे वडील, आई, पती यांनी खंबीर पाठिंबा दिला त्यामुळे हे यश मिळाले असे सांगून या निमित्ताने समाजातल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सादिया यांनी प्रयत्न करावे असे सुचविले.
फातिमाबीची जास्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे एक कविता लिहायला किती त्रास होतो, सादिया मॅडमनी त्यावर पीएचडी केली असे भाष्य शबाना मैडम केले.
नसीम जमादार, तहेसीन सैय्यद, जस्मिन शेख, शबाना मुल्ला, अख्तर पठाण, डॉ. बेनझीर शेख या सर्वांनी डॉ. सादिया यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पीएचडी करणे हे अवघड काम आहे. तरीही अनेक समस्या, अडचणींचा सामना करून डॉ.सादिया यांनी पीएचडी केली ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे असे सायरा चौगूले यांनी सांगितले.
आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. सादिया यांनी आपल्याला विषय निवडीसाठी पुणे विद्यापीठाचे सोनवणे साहेब यांनी मार्गदर्शन केले. फातिमाबी शेख यांचे कार्य सर्व समाजालाच प्रेरक आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा मागोवा घेत आपणही समाजातील मुलींसाठी काही करण्याचा मनोदय व्यक्त केला. सर्व मुलींनी निराश न होता आलेल्या संकटाला सामोरे जावे व आपले लक्ष्य गाठावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलेका शेख -सैय्यद यांनी केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. सादिया यांचे आई वडीलही उपस्थित होते. सर्व भगिनींनी सादियाचे कौतुक केले याबद्दल सादियाच्या आईने आभार मानले. आपल्या मुलीने कुटुंब सांभाळून चिकाटीने अभ्यास केला तिच्या वडिलांनी पाठिंबा दिला म्हणूनच हे यश मिळाले असे सांगितले
या कार्यक्रमास डॉ. सादिया अनिसा शेख, दिलशाद सय्यद, मलेका शेख-सैय्यद, जस्मिन शेख, तहेसीन सैय्यद, शबाना मुल्ला, अख्तर पठाण, सायराबानू चौगुले, नसीम जमादार, डॉ. बेनझीर शेख आदी उपस्थित होते.
– लेखन : मलेका शेख- सैय्यद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800