अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ,मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा विभाग आयोजित पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी डोंबिवलीच्या सांस्कृतिक भूमीवर आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका राजश्री बोहरा (अध्यक्षा मुंबई प्रदेश) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाचे उद्घाटन बहु आयमी व्यक्तिमत्त्व असणारे श्री शरद मधुकर गोरे (संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.म.सा.प) यांच्या हस्ते होणार आहे.
या साहित्य संमेलनाचे आयोजन संस्थेच्या ठाणे जिल्हा विभागाच्या वतीने करण्यात आलेले असून स्वागताध्यक्ष पदी साहित्यिका सौ. अनिता गुजर, (अध्यक्षा ठाणे जिल्हा) या असणार आहेत.
डोंबिवलीचे टी. डी. सी. बँकेचे चेअरमन, स्थानिक नगरसेवक, उद्योगपतीश्री बाबाजी पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अनेक साहित्यिक, सामाजिक व राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर, संस्थेतील विभागीय व प्रादेशिक पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनासाठी ठाणे विभागीय अध्यक्ष, साहित्यिक – श्री बाळासाहेब तोरसकर, कार्याध्यक्ष – श्री अविनाश ठाकूर, उपाध्यक्षा – सौ. मुग्धा कुंटे, सरचिटणीस – सौ. राधिका बापट, ठाणे शहर पश्चिम विभाग अध्यक्षा – सौ. मीना बर्दापूरकर त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगर विभागाचे अध्यक्ष – श्री नवनाथ ठाकूर, कार्याध्यक्ष – श्री प्रतीक नागोळकर, उपाध्यक्ष – सौ. स्मिता धुमाळ, श्री हरिश्चंद्र दळवी, श्री संदीप पाटील, सरचिटणीस – सौ. उज्वला लुकतुके, व चिटणीस – श्रीमती रतन याडकिकर या सर्वांनी मिळून अतिशय मोलाची जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अनेक प्रस्थापित व नवोदित साहित्यिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
विशेष सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवली नगरीत या संमेलनाचे आयोजन भव्य स्वरूपात केलेले. ग्रंथ दिंडी – ग्रंथ पूजा – उद्घाटन – उपस्थितांचे स्वागत – मान्यवरांचे मार्गदर्शन – पुरस्कार वितरण – शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कर – प्रितीभोजन – परिसंवाद – काव्यासंमेलान – आभार असा भव्य व भरघोस एक दिवसिय कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. तरी सर्व साहित्य रसिकांनी संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
🌹खूप छान 🌹
खुप छान 👌👌👌