Saturday, March 15, 2025
Homeबातम्यातंबाखूविरोध : राजेंद्र घरत यांना पारितोषिक

तंबाखूविरोध : राजेंद्र घरत यांना पारितोषिक

३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिवसाचे औचित्य साधून मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंन्टरने आयोजित केलेल्या इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती व कोंकणी भाषेत तंबाखू विरोधी भव्य घोषवाक्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. एका ऑनलाईन सभेत सहभागीना सामील करुन, निकालाची घोषणा करण्यात आली.

या राज्यस्तरीय स्पर्धेत संध्या शंभरकर (गोंदिया), गोविंद गायकी (बुलढाणा), प्रशांत बागुल (नंदुरबार), राजेंद्र घरत (नवी मुंबई) व विजय गोसावी (जळगाव) यांच्या घोषवाक्यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली.

श्री. राजेंद्र घरत.

राजेंद्र घरत यांनी “सुखी जीवनाची युक्ती – तंबाखूपासून मिळवा मुक्ती” हे घोषवाक्य लिहून पाठवले होते. घरत यांनी यापूर्वीही तंबाखूविरोध, अंमली पदार्थ दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, कॅन्सर दुष्परिणाम, विधवा-परित्यक्तांना सन्मान अशा विविध विषयांवरील घोषवाक्य तसेच लेख, कविता स्पर्धा यांमधून भाग घेत पारितोषिके मिळवली असून त्यावर सातत्यपूर्ण विपुल लेखन केले आहे.

मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर येथील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमोलॉजीचे संचालक डॉ राजेश दिक्षित, उपसंचालक डॉ पंकज चतुर्वेदी, प्रकल्प प्रमुख डॉ अतुल बुडुख, राष्ट्रीय तंबाखूमुक्ती सेवाकेंद्राचे पर्यवेक्षक दिनेश मुसळे, दीपा कदम, डॉ सुवर्णा गोरे, डॉ राहुल सोनवणे, सोनाली बागल, प्रतीक सावंत, राष्ट्रीय तंबाखूमुक्ती सेवा केंद्राच्या समुपदेशक कल्पिता लांजेकर, गणेश ओगले, ऋतुजा तसेच सर्व समुपदेशक आदींनी या जनजागृतीपर राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन केले होते.

सध्याचे करोनाबाधेचे वातावरण लक्षात घेता सर्व सहभागींना प्रमाणपत्र; तर विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र घरपोच पाठवली जाणार असल्याचे आयोजकांद्वारे कळवण्यात आले आहे.

नवी मुंबईत जण जागरण
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ३१ मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवशी अन्वय व्यसनमुक्ती केंद्राने तंबाखूतले विषारी घटक, परिणाम, उपाय विषयक पत्रके वाटून तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जाणीव जागृती केली.

छ. शिवाजी चौक वाशी, वाशी रेल्वेस्टेशन आणि नेरुळ स्टे. परिसरात रिक्षा चालक, बस चालक आणि इतर नागरीकांना देखील पत्रकांचे वाटप करून जागृती मोहीम पार पडली. यासाठी अन्वयच्या समुपदेशकांनी सहभाग घेतला.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूपच छान पद्धतीने बातमी व छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशी दखल कुणाचेही मनोबल वाढवणारीच ठरते. खूप धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments