एका स्त्री ची मानसिक वेदना एका कवीने संवेदनशीलतेने या रचनेत मांडली आहे ….
जिणे रोजचे अपमानाचे
कर्म म्हणुनी भोगणे आले ।
दुःख मनीचे सांगू कुणाला
घोट विषाचे म्हणुनी प्याले ।।१।।
शब्द बाणासम मी झेलले
सल त्याची खोलच रुजली ।
येता अश्रुंचे नयनी ओघळ
सांगू कुणा कसे , ती वदली ।।२।।
थांबा द्यावा त्या अश्रूंना तर
मन द्रवता झाले रुजणे ।
होता पिळवण हृदयाची
झाले अवघड ते थांबणे ।।३।।
घाव झेलता लागे जिव्हारी
व्यथा वृद्धिंगत त्या होताना ।
धग निखाऱ्यांची त्या सोसणे
अवघड झाले जगताना ।।४।।
होते जाणून भोग कर्मांचे
ना कधी कुणाला ते चुकले ।
दोष नसला जरी कुणाचा
शांत, तरी अश्रू ओघळले ।।५।।

– रचना : अरुण पुराणिक. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹अप्रतिम कविता 🌹
स्त्री रूपाचे जीवन खूप छान शब्दात मांडले आहे.
ही कविता नसून एक प्रेरणा आहे. पोटतीडीक प्रमाणे आपण लिहिलं आहे.
स्त्री ला अजूनही आपण तो दर्जा दिलेला नाही, हे प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे.
“स्त्री ची व्यथा वेगळी ”
खूप सुंदर सर.
🌹धन्यवाद श्री. पुराणिक सर🌹
अशोक साबळे
Ex Indian Navy
अंबरनाथ
किती झेलती अपमान, किती सोसती भार
तरी ती सांभाळती संसार.
लेक लाडाची ते पत्नी, आई ते सासू किती सांभाळतील नाती.????
खुपच भावनीक कविता 👌👌
🙏🙏🙏🙏धन्यवाद
Very nice
तरी ओघळले अश्रु…अरुण पुराणिक यांची अतिशय संवेदनशील
कविता.
अप्रतीम कविता बाबा👌👌💞