जलशया काठी
फिरंगे बगळे
चोचीतले जीव
ठरती दुबळे
तडफड थांबे
जेव्हा जीव जाई
भुकेची खळगी
तेव्हा भरो येई
भोवळ – भोवरा
जळभर फिरे
एखादा इमानी
गाळातच उरे
एकोप्याने होते
वल्लरी नि चाफे
तिथे माजलेले
सराट्यांचे झापे
दुखावले पाय
रक्तबंबाळती
दुर्दैवी नाशिबे
पालथी पडती
नाकर्त्यांची जत्रा
जमली पांगळी
‘अनिश्चित’ भोती
काढते रांगोळी
मरणाची सेना
जळाचिया काठी
जीवनाची तऱ्हा
ऐसी उफराटी
— रचना : प्राचार्य सूर्यकांत वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800