12 वी नंतरचा काळ.खूप परिक्षा दिलेल्या. रिझल्टची वाट पहात होते….विचित्र मनस्थिती होती त्या वेNळी.
ऍडमिशन कुठे मिळेल ? होस्टेल मध्ये मी ऍडजस्ट करू शकेन का ? असे खूप विचार मनात यायचे…..
खरं तर, “ऍडमिशन तरी मिळेल का ?” असा एक भयंकर उदासवाणा विचार मला हादरवून टाकायचा. अभ्यास तर प्रचंड केलेला. पण मनाची अवस्था खूपच केविलवाणी व्हायची. सकारात्मक विचार करण्यासाठी मन खूप धडपडायचे.
आणि, एके दिवशी माझे मन शब्द झाले. …….
तलवार ………..
आमची ओळख तशी जुनी
सगळे आम्ही होतो मनोमनी
घेऊन गेले आम्हाला बंद पोतडीतूनी
वाटायचं असचं नातं राहू दे जन्मोजन्मी.
कुणा एकाने खाली टाकले पोते धापकन्
त्याचा तर कणाच् मोडला लचकन्
खुशाल लोळत मी जांभई दिली अन्
तेवढ्यात पाय टाकला कुणीतरी टापकन्
होता एक काळा सावळा
म्हणे, “एवढ्या लोखंडाचे काय करायचंय मला ?
देवून टाका भंगारात.
अरे, पण एखाद्-दोन ठेव पट्ट्या
धार देवू आपणच त्याला !”
विचार करण्यात गेली रात्र
मी होतो फारच त्रस्त
सवंगडी म्हणे, “बेटा,काय चिंता करतोस ?
गोदामात जाऊन लोळू मस्त !”
इरादा केला मी पक्का
मित्र म्हणाला, “डोक्याने आहेस तू कच्चा,
घाव घालतील, भट्टीत तापवतील, आगीत लोळवतील,
तेवढं सहन करायला,
वेडा आहेस का तू बच्चा ?”
तो सावळा माणूस आला,
मी म्हटलं त्याला ,
चुलीत तापवा, भट्टीत वाकवा,
घाव घाला, दगडावर धार लावा….
मी सगळं सहन करीन,
गोदामात आळस देण्यापेक्षा आयुष्याचं सार्थक करीन….
मला धार लावा,
माझी एक तलवार बनवा !
भवानी तलवार बनवा !!”

– लेखन : डाॅ.क्षितीजा काळे.,एम्.डी. (पॅथाॅलाॅजी),
आयोवा, अमेरिका.
Beautiful Kshitija
Did not know this hidden talent in you
Keep it up
All the best for ur new venture