भारतातील बहुधा पहिला अंध दिव्यांग गायकांचा १० गाणी समाविष्ट असलेला संगीत अल्बम पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते नुकताच शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर,मुंबई इथे प्रकाशित झाला.
स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमी यांनी या अल्बम ची निर्मिती केली आहे.
प्रकाशन सोहळ्यात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सर्व गीतकारांचा आणि गायकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना डॉ वीणा त्यागराज खाडिलकर यांची होती.
या अल्बम मधील गीतांचा आस्वाद आपण Swarkul Trust या युट्यूबवर, हंगामा, स्पोटिफाय, गाना.कॉम… इत्यादी ठिकाणी घेऊ शकता.
यावेळी ज्येष्ठ निर्माती, दिग्दर्शिका, सब टीव्ही चॅनेल्सच्या प्रमुख कांचन अधिकारी, हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम, विजय पाटकर, प्रमोद पवार, विनय येडेकर, या अलबमचे संगीतकार आणि त्यागराज म्युझिक अकॅडमीचे प्रमुख त्यागराज खाडिलकर, स्वरकुल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वीणा खाडिलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
धन्यवाद !! माननीय भुजबळ सर व अलका ताई आपले मनापासून आभार !!🙏🌹