जरी असे अशी तशी…तुझीच मी !
तुलाच गोंदले उरी…तुझीच मी !
उजाडतो तुझ्यासवे दिवस इथे
पहाटच्या दवापरी…तुझीच मी
दुपारच्या उन्हात उब ही तुझी
सुखावते उन्हातही…तुझीच मी
धपापतो उरात श्वास साजणा
कवेत शांत मज करी… तुझीच मी
न भेटला न बिलगलास राजसा
न स्पर्शता शहारली…तुझीच मी
सभोवती तुझ्यासवे उनाडते
लबाडशी परी जशी…तुझीच मी
हसू नको, रडू नको, जगू कशी?
तुझ्याविना फुलू कशी?…तुझीच मी
लहानशी गझल तुलाच वाहते
कबूल तू महाकवी…तुझीच मी

– रचना : प्रा. प्रतिभा सराफ.

प्रा प्रतिभा सराफ यांच्या प्रतिभेला आप
सर्वानी मनापासून दाद दिली याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
न भेटला न बिलगलास राजसा…
न स्पर्शता शहारली ती सभोवती तुझ्यासवे उनाडते
लबाडशी परी जशी…तुझीच मी
हसू नको, रडू नको, जगू कशी?
तुझ्याविना फुलू कशी? तुझीच मी …..
हृदयापासूनआळवणी करीत पियाला प्रिया विविध विलोम – अनुलोम पेश करीत मनवत आहे… गझलेच्या चित्तवेधक ओळी मनावर गारूड करून जातात.
न स्पर्शता शहारली… ती
सभोवती तुझ्यासवे ऊनाडते लबाड परी… या ओळी तर खासच… खूप खूप आवडल्यात. छुमछुम नाचत बागडणारी एक गोंडस नाजूकशी पण लबाड परी डोळ्यासमोर आली.
गझल साम्राज्ञीस मानाचा मुजरा !!
लहानशी गझल तुलाच वाहते महाकवी…. प्रतिभावंत प्रतिभाजी किती किती छान ना !
यावर खालील ओळी या गझलेच्या नाहीत पण अनाहूतपणे ओठांवर येत गुणगुणाव्याशा वाटल्या.
सांज अशी दाटून आली
आसमंत आज गंधाळला,
आठवांचा हा कल्लोळ
सुगंधित का जाहला …
आजही आठवते मजला
प्रीत होती ती सावळी,
भेट तुझी माझी झाली
अशाच रम्य संध्याकाळी …
आपल्या समग्र विभ्रमासह ती लक्ष वेधुन घेतेय आपल्या प्रियाचे.
आणि, प्रेमाची साद म्हणा वा विनवणी -जवळकीतेचे, मिट्ट गुंतलेले मुग्ध दर्शन घडवितेय ती समर्पिता.
दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे तुझे -माझे असे उत्कटतेचे नाते.
धपापला उर शांत पहडून जाईल तुज़्याच मिठीत, आणि आपल्या असण्याचे अद्वैत असे की , स्पर्शाविनाही सुखाची प्राप्ति सहज होऊन जावी.
भारावलेली मी अशी की , तूच एकला ध्यास धरून -तू जिथे तिथे मी अशी तुझी लबाड परी –लीन तुज़्यात विरघळलेली -तुजविण जगणे अशक्य परि.
ही छोटीशी गजल माज़ी ओवाळून राहिलेय मी.
माज़िया प्रिया, भासते मी कशी तुला?
तुझीच मी रे । तुझीच मी ।
गजल म्हणा,विनवणी म्हणा वा आरती !
आत्मसमर्पित प्रिये ची कैफियत ही ।
फारच सूंदर !
आपण माझ्या गझलचे समग्र परीक्षण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद अरविंद मुळे सर!
खुप आभारी आहोत
मनापासून धन्यवाद मोहन सर
👍सुंदर कविता 👌
🙏धन्यवाद
अप्रतिम कविता
धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद भुजबळ सर, आपण माझ्या गझल ला NewsStoryToday मध्ये स्थान दिलेत!