स्त्रियांच्या दुखण्याला
वाचा कुणी फोडावी ?
तिच्या आसवांना
दिशा कुणी द्यावी ?
अश्रुही सुकले
वाहून वाहून थकले
आधाराने तिला
एका हाताने सावरले
पुरूषाचा तो हात
समोर तो यावा
स्त्रियांनिच स्त्रियांना
धोका का द्यावा ?
सून, सासू, ननंद, भावजय
यापण स्त्रियांच असतात
वारंवार त्या एकमेकींचा
पाणउतारा का करतात ?
हक्क अधिकाराची भाषा
कुणाला तुम्हीं शिकवता ?
नारीमुक्तीचा लढा
पुरूषावर उलटा पुकारता ?
स्त्रियांनिच स्त्रियांचे आसू
पुसायला सामोर यावे
दुःख भावना समजुन
एकमेकांचे हितचिंतक व्हावे…
– रचना : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार.
केम्यान आयलांड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
अलका ताई देवेंद्र दादा खूप सुंदर वाचनीय पोस्ट कविता
खूप खूप सुंदर ब्राझील डायरी