Monday, December 22, 2025
Homeसाहित्यतू बुद्ध आहे…

तू बुद्ध आहे…

तू बुद्ध आहे तू बुद्ध आहे तू बुद्ध ….
साऱ्या मानवतेचा….
ना भेदभाव ना पंथभेद तू तारक, अखिल विश्वाचा …

तुज समिप आला जो जो तो, तुझाच होऊनी रे गेला
जिंकले विश्व नि कलिंग जरी शेवटी फकिर तो झाला…

उघडूनी कवाडे ज्ञानाची, दाविशी दिवा प्रकाशाचा
तुजमुळे थांबला विनाश पुढचा फाकला प्रकाश तो ज्ञानाचा..

येथे ना शाश्वत काही ही सारेच प्रवासी दो घडीचे
जिंकाया निघती माती पाणी जे आहे साऱ्या विश्वाचे …

रे कोण येथला मालक सांगा घेऊनी गेला तो सोबती सारे
मातीच झाली साऱ्यांची हे समजण्यास, विनाश सांग का बरे ?

बुद्धाचा मार्ग तो, अनुसरता रे गळूनी पडती दंभ जगी
वाटली तुझी शिकवण सोपी गुंगते पहा पण सारी मती …

लोभाची मांजरे सारी येथे, रे कशी पचावी शिकवण
जाहला प्रसार नि प्रचार जिथे, जोडती साम्राज्याचे धन ..

तू नाही सोपा बुद्धा रे, वरवरचे सारे वर्ख इथे
काढताच पापुद्रा वरचा, भळभळते बघ ना रक्त तिथे…

तुज पचवावा ऐसा सुज्ञ इथे..? नाही रे नाही कोणी
तुज बुडवून बघना, डोक्यावरूनी गेले रे येथे किती पाणी ..

पण तरी ही तू …
ठाम रहा …तुझी शिकवण सारी “मानवता”
निपजेल बघ रे कुणी तरी
घेईल ध्वज रे पुन्हा हाता

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. ताई , आपली प्रत्येक कविता प्रसंगानुरुप अर्थपूर्ण असते . 🙏🙏

  2. 🌹तू बुद्ध आहेस 🌹

    आपण पामर काय वर्णन करणार

    ताई छान कविता लिहिली

    प्राध्यापक सौ. सुमती पवार धन्यवाद

    🌹🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37