माझ्या आजच्या गोष्टीत ‘तो ‘ आणि ‘ती’ आहेत.
तो आहे बहर..
ती आहे बहार….
तो आहे निशिगंध…
ती आहे रातराणी..
तो आहे पराग..
ती आहे पाकळी..
तो आहे वसंत…
ती आहे वर्षा…!
‘तो’ बहर..
झाडांना मस्त कोवळी कोवळी। पालवी..
तो छोटा छोटा मोहोर..बहर आहे, पण उन्हाच्या झळाही आहेत तेवढ्याच..

नंतर येते ‘ ती ‘ बहार..
त्याच्या पाठोपाठ जणु सप्तपदी चालत..ती सचैल स्नान घालते धरतीला.. हिरवी हिरवी साडी..तिच्यावर। पावसाच्या पाण्याचे दवबिंन्दू.. किंवा अंगभर फुलाफुलांची नक्षी..!आणि कॉन्ट्रास्ट blouse !

‘तो’ आहे निशिगंध..
‘ती ‘ आहे। रातराणी..
तो.. उंच उंच बांध्याचा..ताठ वृत्तीचा..काहीसा काटक..राठ, रांगडा..पण दिसायला सुंदर..

ती.. नाजूक बांध्याची..पटकन लवून नमस्कार करणारी.. काहीशी मादक..

‘तो’ आहे पराग..
‘ती’ आहे पाकळी..
तो फुलांचा पराग.. गेंदेदार..

फुलाचा केंद्रबिंदू.. तर ती त्याच्या बाजूबाजूने वावरणारी पाकळी..त्याच्याभोवती चौफेर पिंगा घालणारी..
पाकळी..

‘तो’ आहे वसंत..
‘ती’ आहे वर्षा..
बहर आणि बहार चेच दुसरे। नाव..


खरंच.. या निसर्गाला अनेक कवी व लेखकांनीं मानवी रूप दिले आहे..पण मी आत्ता वर्णन करत्येय ती जोडी आहे फक्त तो आणि ती यांची..
स्त्रीच्या आयुष्यात तो हवाच.. आणि पुरुषाच्या आयुष्यात स्त्री..तरच माणसाच्या आयुष्यात पूर्णत्व आहे..म्हणून तर स्त्रीला अर्धांगी म्हणतात.
हा ‘ तो ‘ आणि ही ‘ ती ‘ ..म्हणजे जणु बाहुला बाहुलीची जोडी.. किंवा एखाद्या परीकथेतील राजाराणी…!
ही तो व ती ची भावना पुढे अगदी जन्मभर टिकून रहाते..
साधारणपणे सातवी आठवीच्या वयापासून ही अनामिक भावना माणसांच्या मनात जागी होऊ लागते.एकप्रकारची गोडी वाटू लागते एकमेकांविषयी..
या वयात मुला मुलींची मैत्री एक वेगळे गोड रूप घेऊ लागते..नटण्या मुरडण्याचे छान दिवस असतात हे.. चेहऱ्यावर एकप्रकारचे तेज आलेले असते..लेखणीला बहर आलेला असतो..अनेक जण काव्य करू लागतात या वयात. सगळे सुंदर सुंदर भासू लागते चहू बाजूला. जणू ..’ रोज। शाम आती थी.. मगर ऐसी ना थी.. रोज रोज घटा छाती थी… मगर ऐसी न थी.. ये आज मेरे जिंदगीमे कौन आ गया.. हीच। एका गाण्यातील भावना..या प्रेमभावनेवर हजारो प्रेमगीते लिहिली गेली आहेत आजवर..आणि तुफान लोकप्रियही झाली आहेत..सदाबहार आणि एव्हरग्रीन..

हा विषय कधी कंटाळवाणा होत नाही.. होऊच शकणार नाही..दृक् आणि श्राव्य या दोन्ही माध्यमातून ही गाणी पाहण्यात व ऐकण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. गाण्यातल्या अभिनेत्याच्या व अभिनेत्रींच्या जागी तेव्हा आपल्याला जणु स्वतःचे रूप दिसू लागते..
‘आनेसे उसके आये बहार.. अशी स्थिती होऊ लागते. एकमेकांसमोर सारखे दिसावे, सतत एकमेकांचा सहवास लाभावा असे वाटावे असे ते फुलपंखी दिवस..
‘ बहारो फूल बरसाओ , मेरा मेहबुब आया हैं..’ हे गाणे किती छान..किंवा अगदी। ..’ तुम आ गये हो नूर आ गया है..नहीं तो चरागोसे लौ जा रही थी..’किती छान छान म्हणून ठेवलंय या गीतकारांनी.एक सार्वत्रिक रूप दिलंय या गीतकारांनी या नाजूक प्रेमभावनेला..
त्या दिवसात येणाऱ्या एकमेकांच्या वाढदिवसांचेही मोहमयी रूप असते सिनेमात दाखवितात तसे..मोठे मोठे केक आणि किमती किमती गिफ्ट्स..
आपली प्रेयसी आणि प्रियकर हेच जगातील सुंदर चेहरे असे वाटू लागते..अगदी..’ खुदा भी आंसमासे जब जमीपर देखता होगा.. मेरे मेहबूब को किसने बनाया। सोचता होगा ‘ या गाण्यातील स्थिती..

कधी एकमेकांना आजवर न पाहिलेले जीव, एकमेकांत इतके गुंतून जातात की एकमेकांशिवाय अगदी करमेनासे होऊ लागते..मग अंतर्यामी बेचैनी..हुरहूर..एकमेकांच्या घरच्यांविषयी प्रेम, / अभिमान.. हे सर्व आपोआप घडू लागते..
तासंतास फोनवरच्या गप्पा चालू होतात.. खचाखच फोटो/ सेल्फी काढले जातात. प्रेमभावनेला एक आवाहन असते त्या दिवसांमध्ये..
जणु ते गाणे..’ आजा.. आयी बहार दिल हैं, बेकरार ओ मेरे, तेरे बिन रहा न जाये..’
अखेर या सर्वांनंतर प्रेमाची परिणिती गोड अशा विवाहबंधनात होते..पुढे प्रत्यक्ष संसार चालू होतो.. माणसे कामामध्ये गढून जाऊ लागतात..मग यथावकाश मुले बाळे.. एकमेकांसाठी नवराबायको ला आता पुरेसा वेळ न देता येणे हे ओघाने येतेच..
पण तरीसुद्धा नवरा बायकोचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे असे वाटते.. आई वडील.. मुले बाळे सर्व काही यापेक्षा दूरचेच..
काही नवरा बायकोची सतत भांडणे होत असतात.. अबोलाही होतो तेव्हा.. पण थोड्याच वेळात समेट ही होतो.. कारण प्रेमच इतके अतूट असते आतमधे की चैनच पडत नाही एकमेकांवाचून..
‘रुठे रुठे पिया , मनाऊ कैसे’ हे गाणे म्हणल्यावर राग कुठल्या कुठे पळून जाईल नाही तर काय !
असे हे रुसव्या फुगव्याचे क्षण येतात आणि जातात..पण हा कारवा चालू राहतो.. पुढे पुढे जात राहतो..
एकमेकांच्या आवडी निवडी तर आयुष्यभर सांभाळलेल्या असतात/ जपलेल्या असतात.. आता तर या वयात एकमेकांचे सुख एकमेकांचे सुखं झालेले असते आणि एकमेकांचे दुःख एकमेकांचे..
आयुष्यभर केलेला संसार आता उतारवयापर्यंत अधिक अधिक मुरत गेलेला असतो..
आजी आजोबांचे हात आता थरथरू लागलेले असतात..तोंडात कवळ्या बसलेल्या असतात..हातात काठी आलेली असते..
विधवेचे किंवा विधुराचे दुःख आपल्या वाट्याला येऊ नये असे दोघांनाही वाटू लागलेले असते..
कोणी एक आधी निवर्तला, तर दुसऱ्याचे आयुष्य वैराण वाळवंट होऊन जाते..मग सतत दुसऱ्याची उणीव..एक भयाण पोकळी निर्माण होते..अडचणी उद्भवू लागतात रोजच्या जीवनात..एकमेकांबरोबर व्यतीत केलेले सुखाचे दिवस मग सारखे आठवू लागतात..

मग एक गाणे आठवू लागते..
तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं.. तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नहीं..’
मग कसला आलाय बहर आणि कसली आलीय बहार.. फक्त ओठी एका गाण्याचे शब्द..
याद न जाये बीते दिनोंकी..
जाके न आये जो दिन
दिल क्यो बुलाए उन्हे
दिल क्यो बुलाए…
पण अखेर या सुन्या सुन्या झालेल्या जिंदगीतही आधार देतात ती पुन्हा गाणीच..
रुक जाना नहीं तू कही हारके..
काटो पे चलके मिलेंगे साये बहारके..
ओ राही ओ राही
ओ राही ओ राही
किंवा मग आपल्या सुधीर मोघ्यांचे ते काळजाला हात घालणारे गाणे….
भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर..
जरा विसावू या वळणावर,
या वळणावर..।।
कसे कोठुनी येतो आपण,
कसे नकळता जातो गुंतून..
उगाच हसतो, उगाच रुसतो,
क्षणात आतुर, क्षणात कातर..
जरा विसावू या वळणावर..
या वळणावर..।।
कधी ऊन तर कधी सावली,
कधी चांदणे, कधी काहिली..
गोड करुनिया घेतो सारे,
लावुनिया प्रीतिची झालर,
जरा विसावू या वळणावर..
या वळणावर..
अधिक काय म्हणायचे आता दुसरे..
आनंदाने जगायचे
आनंदाने जगायचे..

— लेखन : अनुराधा जोगदेव
— संपादन : अलका भुजबळ. ☎️9869484800