१२ जानेवारी १५९८ साली
जाधव घराण्यात निर्भिड लेक जन्मा आली
शहाजीराजे होते थोर सरदार
त्यांची पत्नी शोभे शूर मातब्बर
नाव तिचे जिजाबाई !!१!!
जिजाऊंच्या पोटी कोहिनूर रत्न जन्मा आले
नाव तयाचे शिवाजी राजे भोसले
राम कृष्णाच्या सांगून कथा संस्कार त्यावर केले
धैर्य, औदार्य, शौर्य अंगी बिंबविले
त्या मातेचे नाव होते जीजाबाई !!३!!
यवनांचा अत्याचार सुरू होता,
गुलामगिरीचा काळ होता
रयत त्रासली होती जनता गांजली होती
शत्रूचा कर्दनकाळ, ती घडवत होती
तिचे नाव होते जीजाबाई !!४!!
घडत होता प्रजाहितदक्ष राजा
भूपती जाणता राजा
ज्यांच्या ध्यानीमनी होती प्रजा
जसा राजा हवा होता स्वराज्या
त्यास घडवी माता जिजाई !!५!!
सिद्धी, औरंग्या मुघल केले नेस्तनाबूत
स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूस ठेविले काबूत
असा घडला शिवबा
त्यास घडवी माता जिजाई !!६!!
क्रांतीची मशाल घेऊन हाती
उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी
घडविला रयतेचा वाली
जप मजूर, महिला शेतमजूराला
अशी शिकवण जिने दिली
धन्य धन्य ती जिजाऊमाऊली !!७!!
नामशेष करून अवघ्या गनिमाला
छत्रपती म्हणूनी जो नावलौकिकास आला
हिंदू राष्ट्र उभारूनी, शत्रूस पाजून पाणी
गुलामगिरी तून प्रजेस केले मुक्त
तिचे नाव होते जीजाबाई !!८!!
शाबूत राखीले मराठ्यांचे तख्त
कोटकिल्ले करूनी काबीज
पळता भुई केली थोडी
गनिमांची ओरबाडली लाज, असा थोर पुत्र शोभे
तिचे नाव होते जीजाबाई !!९!!
असा घडविला राजा महान
जिजाऊ चा जीव की प्राण
जी होती भारतभूची शान
त्या मातापुत्राला शत शत प्रणाम
अशी ही माता जिजाई !!१०!!

– रचना : पूर्णिमा शिंदे
आकाशवाणी निवेदिका मुंबई