Home Uncategorized दत्त दिगंबर

दत्त दिगंबर

0

अनंत काळापासून सकळ ब्रम्हाडांवर तुझीच सत्ता
तुच आमुचा सरकार

दत्त गुरूदेव दत्त दिगंबरा, ब्रम्हा विष्णु महेश्वर
त्रिमूर्ती अवतार श्री गुरूदत्त दिगंबरा

गुरुदेवा तुझा महिमा अपार
गुरूमाऊली अनेक तुझे अवतार

तुच पिठापुरी श्रीपादवल्लभ अवतार
अक्कलकोटी स्वामी समर्थ

शेगावी तु श्रीगजानन अवतार
अनेक कोटी ब्रम्हांड नायक

राजाधीराज जगदगुरू साई समर्थ
तुच माझी गुरू माऊली
कर कृपा आम्हा दिनावर

धर शीतल सदा कृपेची सावली
महामारी कोरोनाचा नायनाट करी

विनंती करीते दोन्ही जोडून कर
प्रार्थना करते तुमच्या चरणी

धाऊनी येई, हिच असे विनवणी तुमच्या ठाई
कुठे शोघ घेऊ ? बाबा किती हाक मारू
तुच आहेस माझा कैवारी तुच माझा तारू

जिकडे जावे तिकडे, मज दिसे तुच अनंत
साई, साई मुखी भजत दासगणू संत.

असे तुमच्या मी साधनात
नका दूर सारू, मायेची घाल पाखर

मन माझे झाले वारु, आश्रयास आले दारा
मीच तुमचा ऊतारू
कृपेविन बाबा तुमच्या कशी मी निवारू

दिवे लावले पाण्याने तुच, सजली दिवाळी
अष्टसिध्दी असती, तुझ्या चरणासी

गंगा, जमुना पायासी, आगंठ्यातुन दावी चमत्कार
करून नायनाट,

संकट निवारी आता, दाव चमत्कार
म्हणून आले धाऊन तुमच्या चरणीं
करण्या विनवणी, तुमच्या चरणीं

सुरेखा तिवाटने

– रचना : सुरेखा तिवाटणे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version