नमस्कार मंडळी,
एकेकाळी रेडिओ आणि रेडिओवर लागणारी मराठी गाणी म्हणजे मराठी माणसाचं मनोरंजनाचं हक्काचं साधन होतं. अवीट गोडीची मराठी-हिंदी गाणी आपला जीव रमवत असत.
कामामुळे थकलेल्या जीवाला या गाण्यांमुळे पुन्हा चैतन्य प्राप्त होत असे, हुरूप येत असे. आपल्या ह्रदयात जागा केलेल्या अशाच काही मराठी गाण्यांबद्दल 🎶🎵📻”ओठावरचं गाणं” 📻🎶🎵 या सदरातून श्री विकास भावे आपल्याशी दर बुधवारी संवाद साधणार आहे.
परिचय …
श्री विकास मधुसूदन भावे यांना,
‘स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा….’ यासारखे तरल भावकाव्य लिहिणारे, विख्यात कविवर्य कै. म. पां. भावे या त्यांच्या वडिलांकडून कवितेचा वारसा मिळाला आहे. त्यांचा ‘त्रिमिती‘ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, चित्रकविता ही त्यांची खासियत आहे.
श्री भावे यांची महाराष्ट्र टाईम्स मधील वाचनीय सदरात पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. अनेक नियतकालिके, साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, लेख, कविता प्रकाशित झाल्या आहेत.
वडील कविवर्य कै. म.पां.भावे यांच्या ‘अरे संसार संसार‘ या विडंबन गीतांच्या कार्यक्रमात व अन्य गाण्यांच्या कार्यक्रमात निवेदक म्हणून त्यांचा सहभाग असतो. साहित्यविषयक विविध उपक्रमात ते नेहमी भाग घेत असतात. रेडिओ विश्वासवर, ‘मला आवडलेले पुस्तक’ या कार्यक्रमात त्यांनी दोन वेळा पुस्तक परीक्षण सादरीकरण केले आहे.
अक्षरमंच कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा क्रमांक ४ मध्ये ‘कलावंत’ या विषयात सर्वोत्कृष्ट काव्यलेखनात श्री भावे यांच्या कवितेला २ रा क्रमांक, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, कल्याण तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखनात ३ रा क्रमांक , फेब्रुवारी २०२० मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेतर्फे भरविण्यात आलेल्या ‘चांदणे संमेलनात‘ विडंबन स्पर्धेत २ रा क्रमांक, ‘रोज एक कविता‘ या फेसबुक पेजतर्फे घेण्यात आलेल्या ‘चित्रावरुन कविता‘ या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक अशाप्रकारे बक्षिसे व पारितोषिकांनी ते गौरवांकित आहेत.
मित्रहो, उद्याचं गाणं आहे कविवर्य पी सावळाराम यांचं. गाण्याचे शब्द आहेत “गंगा जमुना डोळ्यात उभ्या का” तर उद्या स्वागत करू या…. श्री विकास भावे यांचं..
आपली स्नेहांकित
टीम एनएसटी. 9869484800.
विकासजी,
ओठावरचं गाणं हे
सदर…चालू केलेत..
आपल्या लेखणीत रसग्रहण करण्याची जादू आहे.
म्हणजे आम्हाला जुन्या गाण्यांची
मेजवानीच असणार !
कवितेचा वारसा आपले वडिलांकडून आपणास मिळाला आहे..
तो आपण तेवढ्याच ताकदीने चालवत आहात.
अभिनंदन🌹
शुभेच्छा 👌👌👍🌹
विकासजी,
ओठावरचं गाणं …..हे
सदर आपण चालू केलेत..
आपल्या लेखणीत रसग्रहण करण्याची जादू आहे.
म्हणजे आम्हाला जुन्या गाण्यांची
मेजवानीच असणार आहे.
कवितेचा वारसा आपले वडिलांकडून आपणास मिळाला आहे..
तो आपण तेवढ्याच ताकदीने चालवत आहात.
अभिनंदन🌹
शुभेच्छा 👌👌👍🌹
खूप छान
व्वा.. स्वागत आहे. पुन्हा त्या आकाशवाणीवरील आठवणी उजळतील..
धन्यवाद सर