Friday, November 22, 2024
Homeबातम्यादिंडी चालली पंढरी

दिंडी चालली पंढरी

‘आम्ही सिध्दलेखिका‘ ठाणे जिल्हा आणि पाणिनी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिंडी चालली पंढरी’ हा कार्यक्रम आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती डाॅ.अनुराधा कुलकर्णी आणि प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, समिक्षाकार मार्गदर्शक डाॅ.प्रतिभा कणेकर होते.

या प्रसंगी डाॅ.अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या महर्षी व्यास या दीर्घ कादंबरीची संकल्पना स्पष्ट केली. महर्षी व्यासांनी वेदवाङ्मयाचा अनमोल ठेवा संग्रहित केला. महान ॠषीमुनींच्या ज्ञानाचा अनमोल ठेवा आपण वाचला पाहिजे आणि वाचवला पाहिजे अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ. प्रतिभा कणेकर यांनी गुरु परंपरेबद्धल अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करून गुरूंनी दिलेले ज्ञान प्राप्त करण्यास शिष्य तेवढ्याच क्षमतेचे असावे लागतात तरच गुरूज्ञान आत्मसात करता येते आणि टिकवले जाते हे अनेक उदारहणातून स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्था अध्यक्ष, विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी यांच्यासह साहित्य दिंडीने झाली.

अभंग स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या दहा अभंग लेखिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

आशा दोंदे यांनी अभंग रचनेवर प्रत्यक्षदर्शी सुंदर चित्रं काढली तर पारितोषिक घोषणा मानसी जोशी यांनी केली

पाणिनीच्या संचालिका संगीता चव्हाण यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. तर प्रेमदादा झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूभावना व्यक्त केल्या.

दिंडी चालली पंढरी’ हा प्रा.पद्मा हुशिंग यांची संकल्पना असलेल्या संतकाव्य गायनाच्या कार्यक्रमात गायिका संपदा दळवी, सरिता आठवले यांनी उत्कृष्ट अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली तर संत परंपरेची माहिती आपल्या अभ्यासू निवेदनात प्रा. विजया पंडितराव आणि संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांनी दिली.

जेष्ठ साहित्यिक विजया पंडितराव यांची एका वर्षात सहा पुस्तके प्रकाशित झाल्याने त्यांचा खास सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त, सल्लागार मा. आशाताई कुलकर्णी, भारती मेहता, वासंती वर्तक, सचिव वृषाली राजे, दिपा पटवर्धन तसेच अन्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा शाखेच्या पदाधिकारी मानसी जोशी, संगीता चव्हाण, अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदुरकर अलका दूर्गे, किरण बरडे तसेच इतर समिती सदस्यांनी कार्यक्रम नियोजनाची उत्तम जबाबदारी पार पाडली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय दर्जेदार शिस्तबध्द कार्यक्रम पार पडला.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. कार्यक्रम अतिशय आखीवरेखीव आणि सुंदर झाला. आरंभीला दिंडीचे आयोजन छान होते. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांची मोलाची भाषणं आणि मार्गदर्शन अत्युत्तम झाले. आमच्या सभासद भगिनींनी सरिता आणि संपदा दोघींनी त्यांच्या सुरेल आवाजात अभंग गाऊन मुग्ध केले. त्याचबरोबर अल्पोपहाराचे बॉक्स देऊन कार्याक्रमाची सांगता झाली.

  2. हा अतिशय बहारदार कार्यक्रम झाला. जेष्ठ मान्यवर लेखिकांचे विचार सगळ्यांना ऐकायला मिळाले व थोडासा सहवासही . .सौ.अनुराधा कुलकर्णी, सौ प्रतिभा कणेकर.यांचे विचार ऐकण्याची प्रेक्षकांना संधी मिळाली. सिध्दलेखिका ठाणे जिल्हा’ अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग,सचिव प्रा. मानसी जोशी, खजिनदार प्रतिभा चांदुरकर, पाणिनी फांऊडेशनच्या सौ संगिता चव्हाण ,अस्मिता चौधरी यांच्या कल्पनेतून साकारलेली दिंडी दर्शनिय होती.प्रा विजया पंडितराव यानी वर्णिलेली संत परंपरा अप्रतिम.
    संपदा व सरिताच्या अभंगांनी कार्यक्रमाची लज्जत वाढवली.
    माझा खारीचा वाटा या कार्यक्रमात होता ह्याचे समाधान आहे.
    -शुभा खांबेकर पाणसरे.

  3. इंदिरा दास
    9जुलै चा ..दिंडी चालली पंढरी ..कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. आयोजन,निवेदन,गायन ,दिंडी..असा पूर्ण कार्यक्रम बहारदार झाला.पाहुण्यांच्या भाषणातून संतांची उत्तम माहिती मिळाली. आम्ही सिद्धलेखिका कमिटी उत्साहाने ,मनापासून कार्यकम सुंदर आणि यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते .
    अध्यक्ष पद्मा ताई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन चोख असते. पुढील कार्यक्रमा साठी शुभेच्छा

  4. दिंडी चालली पंढरी ह्या कार्यक्रमाची सुरुवात दिंडीनी झाली आणि वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही झाले. त्यानंतर दीपप्रज्वलनच्या ज्योतीने ते तेजाळून निघाले. अलकाचं खुसखुशीत सूत्रसंचालन, पद्माताईंचं प्रास्ताविक, अभंगलेखनाचा पारितोषिक वितरण समारंभ , सगळ्याचं नियोजन उत्तम होतं. पाहुण्या प्रतिभाताई आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुराधा ताई ह्या दोन विदुषींचे मौलिक विचार लक्षणीय होते. Cherry on Top म्हणजे अभंग गायनाचा श्रवणीय कार्यक्रम. संपदा सरीतानी सगळ्यांना मंत्रमुग्ध करुन टाकलं .विजयाताई पद्माताईनी संताचा प्रवास गप्पांमधून उलगडत नेला. आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होता तो म्हणजे चित्रकार आशा दोंदे ह्याचा live demo.विठ्ठल आणि वारीची चित्र त्या झरझर रेखाटत होत्या. एकूण आम्ही सिध्दलेखिकांच्या सख्या छानशी वारी करुन आल्या पंढरीची

  5. 🙏 असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, बहूवर्णीय समाजास उच्चशिक्षित अध्यापक मिळाले,आत्मीयतेने अध्यापन झाले आणि सर्वांना किमान दहाविपर्यंतचे सक्तीचे शिक्षण हे धोरण अवलंबिल्यास योग्य क्षमतेचे शिष्य मिळण्याचा ओघ मंदावणार तर नाहीच, पण वाढच होईल….

  6. संपूर्ण सोहळा लक्षणीय झाला .

  7. त्या दिवशी दोघींनी विठ्ठलमय वातावरण केल होत आणि विदूषी विजया पंडितराव व उत्साही पद्मा हुशिंग यांचं निवेदन खूप अभ्यास पूर्ण होत. पाणिनी संस्थेबद्दल आताच समजलं , मुलांना शिकवून मोठं करण्याची जबाबदारी घेऊन त्यांनी शिवधनुष्य पेलले आहे.

  8. कार्यक्रम खूप छान झाला.. जोहार मायबाप ह्या गाण्याने सर्वांना भक्ती रसात बुडवले..
    सर्व टीम म्हणून एकत्र काम केलं..मानसी जोशी ह्यांनी उल्लेख केला आहे..
    देवेंद्रजी आपले खूप खूप आभार..

  9. खुप सुंदर दिंडी. भक्तीबरोबर साहित्यिक दिंडी

  10. आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या दिंडी चालली पंढरी
    या कार्यक्रमाची संकल्पना मी मांडली आणि सर्व
    सहकारी पदाधिकारी यांनी उचलून धरली.केवळ आठ दहा दिवसात संपूर्ण चार तासाच्या कार्यक्रमाची रूपरेषा
    ठरली आणि अतिशय आखिव रेखिव कार्यक्रम पार पडला.याचं सारे श्रेय आयोजक ,नियोजक , गायिका,निवेदक,आणि येणारे मान्यवर आमंत्रित या सर्वांना मी देते.ठाणे कमिटीचे खास कौतुक आहेच.

  11. छान झाला कार्यक्रम. अध्यक्षा पदमाताई यांनी विश्वास दाखवला आणि आम्ही सख्या मानसी, प्रतिभा, संगीता, शकीला शुभा, किरण, स्वाती यांनी उत्साहाने आयोजन केले. जेष्ठ मंडळीच्या उपस्थितीने चार चांद लागले.

  12. अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला..मी स्वतः पहिल्यांदाच आयोजन केल माझी सखी अस्मिता आजारी होती….पण तीने बर वाटायला लागल्यावर खूपच मदत केली.प्रतिभा,संगीता,शुभा खांबेकर,किरणं,शकीला,स्वाती दोंदे सगळ्यांनीच खूप मदत केली त्याच देखण रुप काल अनुभवल आज देवेंद्रजींनी बातमीत साकारल..
    धन्यवाद सर्वांचे….मानसी मोहन जोशी…. ठाणे जिल्हा सचिव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments