रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 5500 रुपये कोटीचा निधी मंजूर केला आहे. या बंदरामुळे एक लाखाहून अधिक रोजगार तरुणांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या दिघी बंदर प्रकल्पामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून श्रीवर्धन येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज जी गोगटे यांनी नुकतीच श्रीवर्धन आय टी आय ला भेट देऊन दिघी प्रकल्प व अन्य प्रकल्पांना लागणारे कुशल कारागीर तयार होण्यासाठी तिथे कोणते ट्रेड्स उपलब्ध आहेत ? नवीन कोणते ट्रेड्स सुरू करावे लागतील ? त्यासाठी काय अडचणी आहेत ? याविषयी सविस्तरपणे चर्चा केली.
या चर्चेमध्ये आयटीआय मध्ये असलेल्या अडचणी त्यांनी आम्हाला सांगाव्या त्या आम्ही कौशल्य विकास मंत्रालय यांच्याकडे संपर्क साधून अडचणी व तुमचे मुद्दे मांडून तुम्हाला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री मनोज गोगटे यांनी आयटीआय चे उपासने सर यांना दिले.
यावेळी श्री मनोज गोगटे व त्यांचे सहकारी सर्वश्री सुरेश करडे, आदेश पाटील, निलेश जाधव, मनोज जाधव, परेश पोलेकर, हे उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800