Wednesday, February 5, 2025
Homeयशकथादिर्घोद्यगी पोपटलाल डोर्ले

दिर्घोद्यगी पोपटलाल डोर्ले

आजच्या तरुणांनी उद्योग व्यवसायासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, धाडस करावे, कामात सातत्य ठेवावे, प्रामाणिकपणा ठेवावा, ग्राहकांना जास्तीत जास्त चांगले उत्पादन कसे देऊ हे पहिले पाहिजे. अल्पकालीन फायदा पाहण्यापेक्षा दीर्घकालीन विचार केला पाहिजे. ग्राहक,कामगार, कर्मचारी, पुरवठादार अशा विविध घटकांचा विश्वास संपादन करणे आणि तो टिकवणे आवश्यक आहे तरच प्रगतीला चालना मिळते, असे मनोगत सांगली येथील उद्योजक पोपटलाल डोर्ले व्यक्त करतात….

उद्योजक पोपटलाल महादेव डोर्ले यांचा जन्म २० फेब्रुवारी १९४८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण. पण वडील व्यवसायानिमित्त फोंडाघाट येथे आले. त्यामुळे त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण फोंडाघाट येथे झाले, पुढे कोल्हापूरला इंटर सायन्सपर्यंत नंतर कराडला फार्मसीचे शिक्षण झाले.

उद्योजक पोपटलाल महादेव डोर्ले

डोर्लेजी १९७१ साली बी.फार्म झाले. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईला गेले. ४ वर्षे क्वालिटी कंट्रोल केमिस्ट म्हणून त्यांनी एका कंपनीत नोकरी केली. परंतु पहिल्यापासूनच आपण स्वतःचा व्यवसाय करावा असा त्यांचा मनोदय होता.

सांगली येथे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी आहे हे पाहून ते सांगलीला आले. त्यांनी सुरवातीला एका रिपॅकिंग युनिटमध्ये भागीदार म्हणून काम केले. दोन वर्षे झाल्यावर मार्च १९७७ साली माधवनगर येथे त्यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला. सुरवातीला अवघे ४ कामगार होते, तर वार्षिक उलाढाल होती एक लाख रुपयांची. पुढे उलाढाल वाढत गेली.

१९९१ ला वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगलीमध्ये दुसरे युनिट सुरू केले. दोन्ही युनिटमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करत गेले. मालाच्या विक्रीसाठी स्वतः फिरून त्यांनी कार्यक्षेत्र वाढवत नेले. अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना येत गेले. परंतु न थांबता व्यवसायाची वाटचाल सुरू ठेवली, त्यामुळे त्यांची प्रगती होत गेली.

अरीहंत फर्मासिटीकल्स

अभिमानाची गोष्ट म्हणजे आज त्यांची औषध उत्पादने २२ देशात निर्यात होतात. कोरोना पूर्वी तर चीनला सुध्दा त्यांची औषधे जात.

ऑफिस मध्ये

श्री.डोर्ले यांना व्यवसायानिमित्त बाहेरगावी जावे लागत असे. तेव्हा त्यांच्या सौभाग्यवती सौ. रत्नप्रभा व्यवसायाकडे लक्ष ठेवत. मुले मोठी होऊ लागली तशी मुलांना आपल्या व्यवसायात गोडी निर्माण व्हावी म्हणून पहिल्यापासून त्यांनी विशेष प्रयत्न केले व त्याचा परिणामही चांगला झाला.

मुलगा निलेश १९९९ ला बी.फार्म होऊन आवडीने व्यवसायात लक्ष देऊ लागला व बघता बघता त्याने औषध व्यवसायाला नवे रूप दिले. आज डोर्ले उद्योग समूह एक यशस्वी उद्योग समूह झाला आहे. या सर्व उद्योग समुहात जवळपास ६० अधिकारी, तंत्रज्ञ,
कामगार, कर्मचारी असून वार्षिक उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे आज त्यांची औषध उत्पादने २२ देशात निर्यात होतात. कोरोना पूर्वी तर चीनला सुध्दा त्यांची औषधे जात.

कर्मचाऱ्या समवेत

श्री.डोर्ले यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायिक यशाबरोबर त्यांनी सतत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सन २००७ साली डोर्ले फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टला भारत सरकारच्या आयकर विभागाकडून ‘८० जी’ प्रमाणपत्रही मिळाले आहे.

या ट्रस्टमधून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, गरीब रुग्णांना मदत करणे, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील गरीब खेळाडूंना मदत करणे ही कामे तर होत असतात. सन २०११ पासून माधवनगर मध्ये प्रथमाचार्य शांतिसागर व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्याचप्रमाणे सन २०१२ मध्ये स्व.न्या. टी.के तुकाळे लिखित ‘सन्मती सूक्ते’ या पुस्तकाचे आर.एन. बेडकिहाळे यांनी केलेले मराठी भाषांतरीत पुस्तक प्रकाशित केले.

सामाजिक कार्याबरोबरच श्री.डोर्ले आर्थिक, शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान देत असतात. या कामांमुळे त्यांना अनेक ठिकाणी संधी मिळत गेली. त्यामुळे सामाजिक कामाचा आनंद घेता आला व त्यातच त्यांचे जीवन घडत गेले. आज ते सांगली शहर ऍम्यूच्युअर असोसिएशन, सांगली जनसेवा विश्वस्त मंडळ, आरोग्य केंद्र माधवनगर (चॅरिटेबल हॉस्पिटल), श्री अदिनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लि. माधवनगर (जि. सांगली) सांगली जिल्हा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्टरिंग असोशिएशन, इंग्लिश मिडीयम स्कूल,
फार्मसीचे डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स चालवणारी तीर्थांकर एज्युकेशन सोसायटी, डोर्ले फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली, पदवीधर संघटना
दक्षिण भारत जैन सभा अशा विविध संघटनांवर पदाधिकारी म्हणून अत्यंत मनापासून काम करीत आहेत.

पुरस्कार स्वीकारताना (उजवीकडून) मा.खासदार आवाडेदादा, आमदार शरद पाटील, अर्थतज्ञ जे.एफ.पाटील

आतापर्यंत श्री.डोर्ले यांना जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य, उद्योजकता प्रथम पुरस्कार (सन १९९६-१९९७), शेठ वालचंद हिराचंद उद्योग प्रशस्ती पुरस्कार, समाजसेवा गौरव पुरस्कार, युवाशक्ती, व्यसनमुक्ती व एड्स प्रतिबंध संस्कार केंद्र, सांगली, सांगली औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी यांच्याकडून प्रदूषणमुक्त व स्वच्छता पुरस्कार, श्री.फाऊंडेशनचा उद्योजकता पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

श्री. डोर्ले यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा निलेश हा बी.फार्म असून सध्या तो सांगली येथील डोर्ले उद्योग समूहाचा कारभार पाहतो. मोठी कन्या सौ.सुनयना सचिव ढबू (बी.कॉम) यांचे पती सांगलीत तेलाचा व्यवसाय करतात. धाकटी कन्या सौ.भक्ती रणजित भाळवणकर (बी.फार्म.एम.एस्सी.
लंडन) यांचे इंजिनिअर असून दुबई येथे काम करतात.

परिवरा समवेत

श्री. डोर्ले यांना खरे तर इंजिनिअर व्हायचे होते. पण इंजिनियरिंगला प्रवेश न मिळाल्याने त्यांनी फार्मसीला प्रवेश घेतला आणि या क्षेत्राममध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव मिळवले.

आवडीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला नाही, आवडीची नोकरी, व्यवसाय मिळाला नाही, तरी मिळेल ती नोकरी, व्यवसाय आवडीने केल्यास त्यात हमखास यश मिळते, असे त्यांचे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.

निर्व्यसनी राहिल्यामुळे सत्तरीच्या घरात असूनही श्री.डोर्ले आजही सतत कार्यमग्न असतात. त्यांचा हा आदर्श आपण सर्वांनीच घेतला पाहिजे, असा आहे.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. Mr Dharmanuragi Popatrao Dorle having pleasant personality, non egotistical person having social senses. I wish him long healthy life.All the best sir.

  2. hats off to Popatlalji
    परंतु त्यांचे आणखी बरेच पैलु दाखवायचे राहिलेत .
    त्यांना दीर्घायुष्य लाभो व समाजकार्यात यश लाभो

  3. दीर्घोद्यगी पोपटलाल डोर्ले।

    आज आणखी एका सिंधुदुर्गातील लखलखीत हिऱ्याचे दर्शन, भुजबळ सरांच्या लेखातून घडले. उद्योजक डोर्ले यांनी तरुण पिढीला, आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले महत्वाचे घटक प्रेरणादायी आहेत. सिंधुदुर्गातील हया सुपुत्रास मानाचा सलाम! खूप सुंदर लिहिलेत आपण सर!

  4. धन्यवाद सर. मराठी माणसाला अभिमान वाटावा.
    असे व्यवसायीक श्री.डोर्ले यांची प्रेरणादायी
    गोष्टी सांगितली.त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.

  5. अतिशय कष्टाळू आणि शांत स्वभाव असे पोपटकाका डोर्ले यांच खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी