नवी दिल्लीत सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रथमच मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल (क्रमांक ९४) लावण्यात आला असून सदस्यांच्या तिथे ठेवलेल्या साहित्यकृतीं लक्षवेधी ठरत आहे. या स्टॉलची जबाबदारी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, अंतर्गत हिशोब तपासनीस प्रा. हेमंत सामंत आणि सदस्य राजेंद्र साळसकर हे सांभाळत आहेत.
गगनभरारी –
या पत्रकार संघाचे सहसदस्य असलेल्या, निवृत माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या “गगनभरारी” या पुस्तकाला देखील या संमेलनात प्रदर्शित होण्याचा मान मिळाला आहे.

लेखिका कवयित्री लता गुठे यांच्या भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “गगनभरारी” पुस्तकात प्रतिकूल परिस्थिती वर मात करून यशस्वी झालेल्या आणि इतराना मदतीचा हात देणाऱ्या २६ महिलांच्या यश कथा आहेत. अशा प्रकारचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक असून ते लिहिल्याबद्दल जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी प्रस्तावनेत भुजबळ यांचे कौतुक केले आहे.
प्रकाशित पुस्तके :-
देवेंद्र भुजबळ यांची आता पर्यंत…
भावलेली व्यक्तिमत्वे,
गगनभरारी,
स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता,
प्रेरणेचे प्रवासी,
समाजभूषण,
करिअरच्या नव्या दिशा,
आम्ही अधिकारी झालो,
अभिमानाची लेणी (इ बुक) ही पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचे “माध्यम भूषण” हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

संपादित पुस्तके :-
तर देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेली…
कॉमा (लेखिका सौ अलका भुजबळ, डिंपल पब्लिकेशन) तसेच न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेली….
जीवन प्रवास (लेखिका : वर्षा भाबळ),
मी, पोलिस अधिकारी (लेखिका : निवृत पोलीस उप अधीक्षक सुनीता नाशिककर)
समाजभूषण २ (लेखिका : सौ रश्मी हेडे)

पौर्णिमानंद (काव्य संग्रह ; सौ पौर्णिमा शेंडे, निवृत एम टी एन एल उप महा व्यवस्थापक)
मी शिल्पा…चंद्रपूर ते केमन आयलांडस (लेखिका : शिल्पा तगलपल्लेवार गंपावर)
सत्तरीतील सेल्फी (लेखक : निवृत दूरदर्शन संचालक श्री चंद्रकांत बर्वे)
निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांची अजिंक्यवीर, अंधारयात्रीचे स्वप्न, चंद्रकला, हुंदके _ सामाजिक वेदनेचे, अशी चार पुस्तके देखील वाचकप्रिय ठरली आहेत.
या पैकी काही पुस्तकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
मराठी भाषा पत्रकार, संपादक आ.भुजबळ साहेब आपल्या साहित्य कृतीचा ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्टाॅलवर गौरव व विक्री होत आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे.कारण वेळोवेळी या पोर्टलवर खूप दुर्मिळ, ताज्या घडामोडीच्या साहित्यावर विचार मंथन होत असते आणि ते आम्हाला वाचनास मिळते.
मनापासून धन्यवाद सर
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.