दिवस ज्येष्ठांचा,
मावळतीच्या सूर्याचा
गहिऱ्या रंगांचा,
नाजूक हेलकाव्यांचा
सेकंड इनिंगचीच
मजा खरी
बहुतांना वाटे ती
सजा जरी
तरुणाई पेक्षाही असे भारी
निःशंक मने, निखळ मनस्वी
जणू पंढरीची वारी
जोपासून छंद,
संपन्न करिती मनीषा
गाणी गप्पा भटकंती
पार्ट्या होती खाशा
संधीकाल हा
समाधानी वृत्तीचा,
आयुष्यपूर्तीचा
कृतकृत्य जीवांचा
शांत जगण्याचा
निःशब्द आधार अन्,
मैत्री विश्वासाची
कुटुंबापलिकडची,
पैलतीराच्या निश्वासाची
सलाम त्या ज्येष्ठांना,
उत्साही आनंदी तरुणांना
समजूतदार नात्यांना,
तडजोडीच्या विचारांना
शतायु होऊ देत, सगे सोयरे
मैत्र जीवाचे, हीच उरली
आस आता हरी रे
जागतिक ज्येष्ठ नागरिकदिंन !!
लाखभर शुभेच्छा 🌹
— रचना : मीरा जोशी
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मस्तच कविता मीराताई