Friday, July 4, 2025
Homeसाहित्यदिवाळी : एकोप्याचा सण

दिवाळी : एकोप्याचा सण

दिवा वातीचं रे नातं
घर आणि घरपण
काळजाची तेलवात
सांगे एकोप्याचा सण…! १

दारामध्ये रंगावली
रंग सुखाचे कोंदण
माणसाने माणसाला
दिली दिवाळी आंदण…! २

दिवाळीच्या स्वागताला
फराळाची मेजवानी
सुख दुःख राग लोभ
सालंकृत स्वाभीमानी…! ३

एकादशी बारसेनं
येई दिवाळी दारात
सण चैतन्याचा मोठा
आला आनंद घरांत…! ४

आली धन त्रयोदशी
देई आरोग्याचे दान
धन धान्य आरोग्याने
भरो आयुष्याचे पान…! ५

नर्क चतुर्दशी दिनी
करूं अभ्यंगाचे स्नान
फराळाची मेजवानी
लाडू चिवड्याचा मान…! ६

अश्विनाची अमावस्या
लक्ष्मी पुजनाचा दिन
अष्टलक्ष्मी आवाहन
सौख्य संपदेची विण…! ७

कार्तिकाची प्रतिपदा
आला सौभाग्य सुदिन
गृहलक्ष्मी मानपान
नेत्रज्योती मिण मिण….! ८

भाऊबीज सण खास
करी आनंद वर्धन
माया ममता बंधुता
संस्कारांचे संवर्धन…! ९

अशी दिवाळी सांगते
मना मनात राहूया
शब्द किरणांचा दीप
अंतरात चेतवूया…! १०

विजय सातपुते

– रचना : विजय यशवंत सातपुते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments