Sunday, February 15, 2026
Homeसाहित्यदिवाळी : काही रचना

दिवाळी : काही रचना

१. आली दिवाळी

मिणमिणत्या पणत्यांची
रास उभारू घरीदारी
दिपावलीच्या निमित्ताने
स्वप्न पूर्ण होवोत सारी

अमावस्येच्या काळोखातील
अंधार संपू दे सारा
लावून दीपमाळ चोहीकडे
प्रकाशित करू आसमंत सारा

लाडू, चकल्या, करंज्या,
अनारसे, शंकरपाळी,
अन् खुसखुशीत चिवडा
अभ्यंग स्नानाचा थाटच वेगळा

दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर
आपली होवो
प्रगती अन् भरभराट
याच माझ्याकडून शुभेच्छा.

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई

२. लक्ष्मी पूजन

लक्ष्मी गणेशा आम्ही करितो वंदन
पूजनीय तुम्हां आळवितो भक्तीनं ।।धृ।।

अग्नी तुम्हा आणील प्रार्थीतो आदरानं
सोन पैंजणे पाऊले येसी घरांत
स्वागत करितो पुष्पहार अर्पून II1II

साधू सज्जनांचे वससी हृदयांत
सौभाग्य ऐश्वर्य सुख देसी आनंद
सिद्धी बुद्धी दाता गणेशास वंदन II2II

सूर्यासम होशी कोटी तेजवान
चतुर्भुजा असशी पंकज नेत्रवान
व्यंकटेशाची पट्टराणी दिसे शोभून ।।3।।

कीर्ती विजय राज्य शोभते अष्टरूप
धैर्य शौर्य विद्या देसी धन धान्य
लक्ष्मी वर्षाव होवो दोन्ही करांतून ।।4।।

— रचना : अरुण गांगल. कर्जत, जि. रायगड

३. दिप उजळू दे…

एक दिप उजळू दे, माझ्या अंगणात
येईन लक्ष्मी-कुबेर राजा, माझ्या घरात

धन धान्य ऐश्वर्याची, राहो  भरभराट
सुख शांती सदा नांदो, माझ्या दारात

आचार विचार संस्कारांचा, असो सदा वास
समृद्धी संस्कृती संपन्नता, वसो जीवनात

लेकूरे उदंड व्हावी, स्वप्ने घेऊन  उरात
बलवान भारत घडो, अखंड  विश्वात

गरीब श्रीमंतीची दरी, मिटावी समाधानात
दारिद्र्याची नसावी रेषा, माझ्या देशात

स्वच्छ सुंदर निर्मळ जन गण, राहू कल्याणात
समतेची मशाल एकतेचा ध्वज, पाहू गगनात

ममत्वाचा एक दिप, जळो अंगणात
स्वर्ग सुख लाभो सदा, गरीबा घरात

— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11