(अष्टाक्षरी ओळकाव्य)
दिवा मनाच्या अंगणी किरणांची मात्तबरी ।
अंध:कार दूर सारी ज्योत उजळे अंतरी ।।१।।
भय जाते काळोखाचे दिवा मनाच्या अंगणी ।
उजळता तम दूर विचारांच्या या प्रांगणी ।।२।।
येता दिन आवसेचा नको संकट आपदा ।
दिवा मनाच्या अंगणी शांती सुखाची यशदा ।।३।।
प्रकाशीत होण्या सारे चंद्र तारे नभांगणी ।
उजळण्या कर्म, लावी दिवा मनाच्या अंगणी ।।४।।

— रचना : अरुण पुराणिक. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Khupch chan …