Saturday, July 5, 2025
Homeबातम्यादिव्यांग कोराईगडावर !

दिव्यांग कोराईगडावर !

वर्षभर दिव्यांगासाठी वेगवेगळ्या दुर्ग मोहीमांचे, अभ्यास दौ-यांचे शिवुर्जा प्रतिष्ठान, पैठण मार्फत आयोजन केले जाते. दिव्यांगांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे व छत्रपती शिवरायांची दुर्गनीती, इतिहास अभ्यासणे हा या मोहिमांचा मुख्य उद्देश असतो.

या अनुषंगाने कोराईगड दुर्ग ट्रेक भ्रमंतीसाठी राज्य भरातून बारा दिव्यांग नुकतेच सहभागी झाले होते. बीडचे इतिहास अभ्यासक दुर्गप्रेमी कचरू चांभारे, मुख्याध्यापक रमेश गाडे यांचाही या मोहिमेत सहभाग होता.

कोराईगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात लोनावळापासून 25 किमी अतिशय उंचावर आहे. दुरून हा किल्ला उंचच उंच धिप्पाड भिंतीसारखा दिसतो. दाट झाडी, ओबडधोबड रस्ते, अवखळ ओढे पार करत सहभागी दिव्यांगांनी तीन तासात 3100 फुट उंचीचा गड एकमेकांना आधार देत सर केला.

सर्वोच्च उंचीवर असलेले कोराईमातेचे मंदीर, महादेव मंदीर, जुळे तळे, गणेश मंदीर, चोर दरवाजे पाहून सोबत आणलेली शिदोरी खात वनभोजनाचा आनंद घेतला. श्री कचरू चांभारे यांनी कोराईगडाची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सांगितली.

या दुर्ग मोहिमेचे आयोजन शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे, पैठण यांनी केले होते. दिव्यांग चळवळीत शिलेदार असलेले धर्मेंद्र सातव पुणे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. एकाच पायावर चालणारे कर्जतचे जनार्दन पानमंद, एकच हात असलेले जीवन टोपे, 75 गडकिल्ले सर करणारे केशव भांगरे, कळसुबाई विक्रमवीर अंजली प्रधान, जगन्नाथ चौरे ठाणे, मच्छिंद्र थोरात शिरूर, रमेश गाडे बीड, कैलास दुरगुडे, वैजनाथ देवाळकर, प्रा.महेश गोंडे, सुशीला नाईक यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

पावसाळी वातावरणात अवघड किल्ला ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे सर्व स्तरातून दिव्यांग बांधवांचे कौतुक होत आहे .

– टीम एनएसटी, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments