कामोठे गावचे होतकरू युवा नेतृत्व, आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे पनवेल तालुका कार्याध्यक्ष श्री. वृषभदादा गोंधळी यांच्या सहकार्यातून आज एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं. त्यांनी श्री.विजय म्हात्रे या दिव्यांग समाज बांधवाला खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे येथे अपंग स्टॉल उभा करून दिला आणि खऱ्या अर्थाने आपल्या एका… दिव्यांग समाजबांधावला रोजगार उपलब्ध करून देत उद्योजक बनविले.
वृषभदादा गोंधळी यांच्या प्रयत्नातून संघटनेच्या नावाचा स्टॉल रुहिज किचन… उभा करून आगरी, कोळी, कराडी पद्धतीच्या झणझणीत स्वादिष्ट जेवणाच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या श्री.विजय म्हात्रे यांना संघटनेच्या वतीने रोख रक्कम ५,००० /- ( पाच हजार ) व्यवसाय करिता आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.

ह्या सर्व गोष्टींची जाणिव ठेवत श्री.विजय म्हात्रे यांनी अपंग स्टॉलच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी खास करून श्री.वृषभदादा गोंधळी आणि आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे सोबतच कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी श्री.भारतदादा भोपी, श्री. रोहदादा पाटील, श्री. रवीदादा घरत, श्री. प्रदीपदादा पाटील, श्री.काळूरामदादा पाटील, श्री. गोपीनाथजी भगत, श्री सदानंदजी भोईर, सौ.प्राजक्ताताई गोवारी, श्री रोशनजी म्हात्रे आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

— लेखन : अनिल ज. घरत पिरकोन. उरण
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800