खेलो इंडिया अंडर १७ अंतर्गत वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या (WIFA) फुटबॉल टूर्नामेंट मध्ये
मुलींची रायगड डिस्ट्रिक्ट टीम पहिल्यांदा सहभागी झाली. विशेष म्हणजे या टीमने दुसरा क्रमांक पटकविला. ही स्पर्धा कुपरेज ग्राउंड, कुलाबा, मुंबई येथे झाली.
टीमच्या ह्या अद्वितीय कामगिरी मध्ये मिड्फिल्डर् ह्या पोझिशन वर खेळणारी उरण ची सुकन्या दिव्या दुर्गादास नायक हिची कामगिरी महत्वाची ठरली.
दिव्याने फुटबॉल क्षेत्रात वयाच्या १० व्या वर्षी सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी, उरण मार्फत पदार्पण केले. तेथून तिने फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
“तिचे खेळाबद्दलचे प्रेम, उत्साही वृत्ती हिच तिच्या यशाची गुरुकिल्ली सिद्ध होणार आहे” असे तिचे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे यांनी सांगितले.
दिव्याचे स्वप्न फुटबॉल जगतात वाटचाल करणे
हेच आहे. त्याही पलीकडे तिला आपल्या देशासाठी खेळण्याची खूप मोठी इच्छा आहे, असे तिचे वडील दुर्गादास नायक म्हणाले.
स्पर्धेनंतर वेस्टर्न इंडिया फूडबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व मुंबई डिस्ट्रिक्ट फूटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ह्या मुलींना गौरविण्यात आले. त्यांनी ह्या मुलींना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे यश मिळाल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

– लेखन : विठ्ठल ममताबादे. उरण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800