ज्ञानदीप लावू या जगात
अज्ञानाचे तिमिर जावोत ।।ध्रु।।
प्रेम ज्ञान देत दीपज्योत
त्याग एकाग्रता शिकवीत
सद्गुण अविचल रहात. ।।1।।
प्रकाश अंधार ना पहात
सूर्याला रात्र ना दिसत
चैतन्य देई दीप सतत ।।2।।
उंबर्यावर दीप ठेवूया तेवत
उजेड पडेल बाहेर आंत
मिळे वैराग्य शुद्धता सुखद ।।3।।
लावतात दीप सर्व कार्यांत
तमोगुण विक्षेप जाळीत
प्रज्वलन हवा करीत शुद्ध ।।4।।

— काव्य : अरुण गांगल. कर्जत –
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800