दुःख असले जरी
गोड मानून घ्यावे
अमृत समजून विष
शंकरासम ओठी लावावे
पर हिताच्या विचारात
आयुष्य झोकून द्यावे
दीनदु:खितांच्या कल्याणा
चंदन देहाचे झिजवावे
दुसऱ्याला आनंद देता
होते सुखाची परमावधी
स्वतःसाठी तर जगतोच सारे
जगून बघावे इतरांसाठी कधी
सकारात्मक विचाराने शिकावे
दुःखाचे डोंगर झेलाया
छोट्या छोट्या गोष्टीतून
साधावी सुख शोधण्याची किमया
दुःख जरी असले
उंच पर्वता एवढे
देईल समाधान सुख
कणभर जवा एवढे
फक्त तयारी हवी
दुःखाला सामोरं जाण्याची
हीच तर आहे खरी
गुरुकिल्ली सुख मिळवण्याची

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800