Monday, July 14, 2025
Homeबातम्यादुर्गम पाड्यात 'शौचालय दिन'

दुर्गम पाड्यात ‘शौचालय दिन’

आपली प्रगती होत असली तरी, आजही खेड्यापाड्यातील असंख्य कुटूंबाना शौचालया अभावी उघड्यावर शौच करावी लागते. बांधकामासाठी पुरेसा पैसा नसणे, शासकीय यादीत नाव नसणे, मानसिकता अशी अनेक कारणे त्यामागे आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रसाद चिकित्सा या स्वयंसेवी संस्थेने, गणेशपुरी आणि भोवतालच्या सुमारे दहा ते पंधरा किलोमिटरच्या परिसरातील उपेक्षीत कुटूंबांना शौचालय उभारुन देण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत सुमारे आठशे पेक्षा जास्त घरांमध्ये शौचालय उभारणीसाठी संस्थेने मदत केलेली असून हा प्रकल्प जोरात चालु आहे.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणुन संस्थेने १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन गावातील महिलांसोबत साजरा केला. या कार्यक्रमासाठी वाडा तालुक्याच्या सीमारेषेवर दुर्गम ठिकाणी वसलेल्या नेवाळपाडा या आदिवासी पाड्याची निवड केली होती. सुमारे साठ घरांची लोकवस्ती असलेल्या या पाड्यात आजही निम्म्यापेक्षा जास्त घरांना शौचालया अभावी उघड्यावर शौचास जावे लागते.

या कार्यक्रमात प्रसाद चिकित्सा दवाखान्यातील डॉ. नम्रता व डॉ. शार्वला यांनी चाळीस पेक्षा जास्त संख्येने उपस्थित असणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करून शौचालय व आरोग्य यांचा कसा जवळचा संबध आहे हे स्पष्ट करुन सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित असलेले वाडा तालुका स्वच्छ भारत मिशनचे कार्यक्रम समन्वयक, श्री. किरण मोरे यांनी शासनाची योजना, लाभाचे स्वरुप आणि तरतुदी स्पष्ट करुन सांगितल्या.

कार्यक्रमास केळठण गावच्या नवनिर्वाचीत सरपंच सौ. पुष्पा चातुर्य सुद्धा उपस्थित होत्या.

कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या जनसमुदायास घेऊन नुकत्याच बांधलेल्या शौचालयाचा दौरा करण्यात आला. तेथे लाभार्थी महिलेने शौचालय बांधले नव्हते तेव्हाची परिस्थिती व बांधल्यानंतर झालेल्या चांगल्या बदलाची स्थिती सांगितली. शौचालय बांधण्याची निकड त्यामुळे उपस्थितांच्या लक्षात आली.

प्रसाद चिकित्साचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. रावसाहेब मोटे यांनी सुद्धा शौचालयाची रचना व प्रसाद चिकित्साकडून पुरविण्यात येणाऱ्या मदतीचे स्वरुप सांगतले.

अनेकांनी आपली नावे प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी प्रसाद चिकित्सा कार्यकर्त्याकडे लगेच नोंदवली. नजिकच्या काळात पाडा हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार सर्वांनी बोलून दाखविला.

उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments