नमस्कार मंडळी,
आजपासून सुरुवात होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनापासून हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
नवदुर्गा म्हणजे देवी दुर्गामाताने नऊ दिवसात भक्तगणांसाठी घेतलेले दुर्गम्य रूप, दुर्मीळ रूप. नवदुर्गा मधील पहिलं रूप, पहिल्या दिवशी पूजली जाणारी दुर्गादेवी म्हणजे शैलपुत्री माता. दुर्गेचे पहिले रूप ‘शैलीपुत्री’ या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा शैलपुत्री ही हिंदू मातादेवी महादेवीचं शुध्द प्रकटीकरण रूप आहे.
शैलपूत्री देवीच्या कपाळावर चंद्रकोर आहे, ही देवी द्विभूजा आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूल आहे तर डाव्या हातात कमलपुष्प आहे. तिचे वाहन बैल आहे. प्रत्येक व्यक्तीत सहा चक्र असतात ती अव्यक्त रुपात स्थित असतात. शैलपुत्री देवी ही मुलचक्राची देवी आहे. मूलाधार चक्राशी निगडित आहे. या मूलाधार चक्राचे बीज मंत्र ‘लं’ आहे.चार पाकळ्या असलेले हे मूलाधार चक्र आहे.
या देवीची उपासना, आराधना केल्याने आपली मनोकामना पूर्ण होण्यास जी शक्ती लागते ती आपल्यात निर्माण होते. दैवीशक्ती प्रत्येक व्यक्तीत अव्यक्त रूपात असते. ही शक्ती या देवीच्या साधनेने जागृत होते व तिचा प्रवास वरच्या दिशेने म्हणजे उर्ध्वगतीने सुरू होतो.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त आपले मन मूलाधार चक्रावर केंद्रित करतात. हा आध्यात्मिक उत्क्रांतीसाठी प्रारंभबिंदू आहे. या देवीचा रंग किरमिजी म्हणजे करडा आहे. हा रंग आपल्या शरीरातील ताकद आणि संचित उर्जेच्या आराधनाचे प्रतिक व स्थैर्य दर्शवतात.
शैलपुत्री देवी पृथ्वीतत्वाशी निगडित आहे. भक्तांना ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती देणारी आदिशक्ती आहे.
— लेखन : पूर्णिमा शेंडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच छान
खूप छान माहितीपूर्ण लेख आहे. 🙏🌹