‘जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस’ दूरदर्शन सह्याद्रीवर उद्या विशेष कार्यक्रम.
१९९३ सालापासून दरवर्षी ३ मे हा ‘जागतिक प्रेस
स्वतंत्रता दिवस‘ म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवसाचे औचित्य, महत्व, आजची जागतिक स्थिती अशा विविध बाबींवर उद्या, सोमवार २ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजता, मुंबई दुरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर “हॅलो सह्याद्री” या सदरात विशेष कार्यक्रम होणार आहे.
थेट प्रसारण होत असलेल्या या कार्यक्रमात निवृत्त माहिती संचालक, माध्यम अभ्यासक तथा न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वे संपादक, श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत निवेदिका चैताली कानिटकर या घेणार आहेत. कार्यक्रमाचे निर्माते डॉ आलोक खोब्रागडे हे आहेत.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात ०२२ २४९०८०५०/
२४८०५०९८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून प्रेक्षकही सहभागी होऊ शकतील.

हा कार्यक्रम बघून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
– टीम एनएसटी. ☎️ +९१ ९८६९४८४८००
अभिनंदन आणि शुभेच्छा⚘
अभिनंदन भुजबळ सर ! तुमची मुलाखत म्हणजे, तरुण पिढीला नव्या मार्गाचे नवे धडे, तुमची मुलाखत ऐकताना, चैत्यन्याचा वाहता धबधबा जणू !
सौ. वर्षा भाबल.
🌹 अभिनंदन सर 🌹
आतुरतेने वाट पाहत आहोत.
एक शब्द पर्वणी ऐकायला मिळेल.
धन्यवाद
अशोक साबळे
सर, तुमच्या मुलाखतीचा कार्यक्रम म्हणजे नक्कीच बुद्धीला खाद्य मिळणार आहे. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा…
अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे सह्याद्री वाहिनीने सर तुमची मुलाखत म्हणजे अजून एक शब्द धन पर्वणी आहे खूप काही शिकण्यासारखे मनापासून आपले अभिनंदन आणि सस्नेह शुभेच्छा व सदिच्छा 💐💐🙏🙏