अष्टाक्षरी काव्य रचना
माता शोभे आदीशक्ती
नामे खड्ग धारिणी
त्राही माम् त्राही माम्
दैत्यनाशा तू हारिणी ll१ll
भक्त संकट समयी
धावे अष्टभुजा रूप
तलवार करी शोभे
भूत प्रेता दावी धूप ll२ll
आदीमाया आदीशक्ती
नेत्री ज्वाला भडकती
अग्नी नयनी तापोनी
दैत्य सारे धडकती ll३ll
वज्रेश्वरी संहारण्या
शंख नाद ब्रह्मांडास
शुंभ निशुंभ दैत्यांचा
धरेवर केला ऱ्हास ll४ll
पिता प्रजापती क्रोधी
अग्नी कुंडा घेई झेप
सामर्थ्यात उजवली
शिव घेतला आक्षेप ll५ll
रूपे विलोभनीयता
अमृताच्या मंथनात
नारी रूप शक्तीशाली
दैत्यां लोळवी क्षणात ll६ll
नासिकेच्या उष्माघाती
केला दैत्यांचा संहार
महिषासुराचा वध
नामे जोडी सोपस्कार ll७ll

— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आदिशक्ती…आदीमाता…की जय…मस्तच