न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलचे संपादक तथा महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्रजी भुजबळ साहेबांच्या प्रेरणेमुळे, शरणपूर वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी पुढे आलो असल्याची भावना पुणे येथील आनंदयात्री मदन रामनाथ लाठी यांनी व्यक्त केली.
गरिबांसाठी मोफत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमाला फ्रीज भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम पुणे येथील आनंदयात्री, मूळ जळगाव निवासी मदन रामनाथ लाठी यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
श्री लाठी पुढे म्हणाले की श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी या वृद्धाश्रमाला भेट दिली. भुजबळ साहेबांची प्रेरणा व पाठबळ वृद्धाश्रमाला आहे म्हणूनच अनेक दाते या वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी पुढे येत आहे आणि येत रहातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रमाला फ्रीज सारखी भेटवस्तू अर्पण करत असल्याचे सांगत वृद्धाश्रमातील अडलेल्या नारायणाची सेवा मला करता आली यामध्ये देव भेटल्याचे समाधान वाटले असल्याच्या भावना श्री लाठी यांनी व्यक्त केल्या.वृद्धाश्रमाच्या उत्कर्षासाठी माझ्या मित्र परिवार व आप्तजन यांना वृद्धाश्रमाला जोडण्याचे काम आपण करत राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वृद्धाश्रम संचालक रावसाहेब मगर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृद्धाश्रमाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शरणपूर वृद्धाश्रमाच्या प्रांगणात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात, श्री मदन रामनाथ लाठी, भाजपचे नगरसेवक इंजिनियर सुनीलभाऊ वाघ, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीनभाऊ दिनकर, भाजप शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे, भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य संपर्क प्रमुख निरंजन डहाळे, मार्केट कमिटीचे माजी सहसचिव बाळासाहेब पारखे, श्री कालभैरवनाथ वेलनेस सेंटरचे प्रमुख भाऊसाहेब येवले सर, रांजणगाव गणपती येथील युवा उद्योजक निलेश शेळके, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर, युवा कमिटी अध्यक्ष अक्षयकुमार देवखिळे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– टीम एनएसटी, 9869484800
शरणपूर वृध्दाश्रमासाठी थाटलेला खूप सुंदर उपक्रम,भुजबळ सरांच्या प्रेरणेने जागृत होणे, सर्व माननीय व्यक्तींनी साथ देणे, सारेच कौतुकास्पद आहे. आपल्या सामाजिक कार्य भावनेस मानाचा मुजरा! सर.
वर्षा भाबल.