भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्त माहिती संचालक तथा ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते आज सातारा येथील श्री कालिकादेवी मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री भुजबळ यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून सुस्थितीतील प्रत्येक व्यक्तीने एका तरी गरजू व्यक्तीला मदत केली पाहिजे असे प्रतिपादन केले.
प्रारंभी कर सल्लागार तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत कासार यांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास विशद करून प्रत्येक नागरिकाने आपले देश प्रेम सतत जागे ठेवले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई कुंदप, निवृत्त मुख्याध्यापक अनंत कांबळे, सौ पूर्णिमा कुंदप यांची समयोचित भाषणे झाली.
कालिका पत पेढीचे अध्यक्ष अजय झुटिंग यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.
ध्वजारोहणानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्री सुमित टाकसाळे, पल्लवी शहा, सरिता खरात, दुर्गा राज पुरोहित, राजेंद्र ओसवाल, मधुकर जोशी यांनी देशभक्ती पर गीते गायली गेली. शेवटी अल्पोपहार झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी समाज बंधू भगिनी, महाकालिका योग वर्गाचे उपासक उपस्थित होते.

– लेखन : अशोक कुंदप. ☎️ 9869484800