प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीतर्फे आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांना “उत्कृष्ट संपादक पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मुंबई येथील नॅशनल कॉलेज च्या सभागृहात उद्या रविवारी राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ जी डी यादव यांच्या हस्ते, नासा चे शास्त्रज्ञ डॉ डेरिक एंजलस्, वर्ल्ड व्हिजन, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष प्रा नागेश हुलावले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
अल्प परिचय
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी आणि गेली चार वर्षे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे (www. newsstorytoday.com) संपादक असे मिळून गेली ४० वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत.
देवेंद्र भुजबळ यांची आता पर्यंत ८ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी संपादन केलेली “जीवनप्रवास”, (आत्मचरित्र);
“समाजभूषण २”, (यशकथा संग्रह); “मी, पोलीस अधिकारी”(आत्म चरित्र),; “पौर्णिमानंद”, (काव्य संग्रह),; “अजिंक्यवीर”(आत्मचरित्र); “अंधारयात्रीचे स्वप्न” (वडिलांचे चरित्र); “चंद्रकला” (कादंबरी); “हुंदके सामाजिक वेदनेचे” (वैचारिक लेख संग्रह),; “मी शिल्पा… चंद्रपूर ते केमॅन आयलंडस (आत्म चरित्र) ही पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत.
यातील काही पुस्तकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री भुजबळ यांचे समाजाच्या सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
मनःपूर्वक अभिनंदन सर
🙏 माननीय ,आदरणीय देवेंद्र जी इतका मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा उभयतांकडून मनःपूर्वक अभिनंदन .आणि शुभेछा.
🙏माननीय ,आदरणीय देवेंद्र जी इतका मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा उभयतांकडून मनःपूर्वक अभिनंदन .आणि शुभेछा.
🤝🤝 धन्यवाद असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या
मन:पूर्वक अभिनंदन सर.
आदरणीय न्युज स्टोरी टुडे चे संपादक माननीय श्री देवेंद्रजी भुजबळ यांचे अभिनंदन.उत्कृष्ठ संपादक म्हणून पुरस्कार प्राप्त होणे म्हणजे साहित्यिक क्षेत्रातील मानाचा पुरस्कार.
खूप खूप अभिनंदन सर🌷
देवेंद्र भुजबळ सर मन:पूर्वक अभिनंदन!!
देवेंद्र सर, मन:पूर्वक अभिनंदन 💐💐
आदरणीय संपादक देवेंद्र भुजबळ साहेबांना उत्कृष्ट संपादक हा मोठा सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला व उद्या मिळणारा पुरस्कारा बद्दल मनापासून शुभेच्छा व अभिनंदन…
शुभेच्छूक:- गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.
भुजबळ सर तुमचे खूप खूप अभिनंदन!
Congratulation sahebji
💐💐💐 खूप खूप अभिनंदन सर 💐💐💐