Thursday, September 18, 2025
Homeबातम्यादेवेंद्र भुजबळ यांना मानाचा चौथास्तंभ पुरस्कार

देवेंद्र भुजबळ यांना मानाचा चौथास्तंभ पुरस्कार

पत्रकारितेत अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘चौथास्तंभ पुरस्कारसामाजिक सेवा वर्गात न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय, वेबपोर्टलचे संपादक, निवृत्त माहिती संचालक, देवेंद्र भुजबळ यांना जाहीर करण्यात आला आहे.

या पोर्टलवर सामाजिक बांधिलकीतून वृत्त, लेख, यशकथा प्रसिद्ध करण्याच्या यशसाधनेबाबत त्यांना हा पुरस्कार मिळाला असून त्यांचे विविधस्तरावरून अभिनंदन होत आहे.

पत्रकारितेचे नवे दालन उभे करून ते यशशिखरावर नेण्याच्या श्री.भुजबळ यांच्या संपादन कौशल्यावर ‘अप्रतिम मिडिया’च्या चौथ्या स्तंभ पुरस्काराची उठलेली मोहोर, सगळ्यांनाच गौरवान्वित करून गेली आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे विविध पुरस्कार अप्रतिम मिडियाने सार्वमत घेऊन जाहीर केलेत. त्यात पत्रकारितेच्या कामाची कसोटी तावून सुलाखून पाहिली गेली, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख, संपादक डॉ अनिल फळे यांनी दिली. त्यामुळे एका सापेक्षी पत्रकाराचा झालेला गौरव उठून दिसणारा आहे.

श्री.भुजबळ संपादक असलेल्या न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलवर, आगळ्या वेगळ्या स्टोरीज प्रसिद्ध करण्यात येतात. पाहता पाहता या वेब पोर्टलची लोकप्रियता वाढून सध्या जगातील ७७ देशातील ३ लाख २१ हजार १८० व्ह्यूज या पोर्टलला मिळाले आहेत. यातूनच देवेंद्र भुजबळ यांचे संपादकीय कौशल्य स्पष्ट होते. यात त्यांची पत्नी अलका व कन्या देवश्री यांची त्यांना पूर्ण साथ लाभली आहे. कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता, कुठलीही पगारी व्यक्ती न ठेवता या कुटुंबाचा सामाजिक बांधिलकीची जाणीव, समाजासमोर आचार, विचारांच्या आदर्शांचे मनोरे उभे करून त्यातून संस्कारीत समाजमन घडविण्याचा ध्यास स्पष्ट होतो. या ध्यासाचाच या पुरस्काराने गौरव झाला आहे.
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देवेंद्र भुजबळ समाज सेवाध्यासाला वेब पोर्टलमार्फत प्रवृत्त झाले. पाहता पाहता पोर्टलची लोकप्रियता त्यांच्या संपादन कौशल्यातून वाढली. यातून यशशिखराच्या कमानीचे नवे दालन त्यांच्याकरीता खुले झाले.

श्री.भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात आणखी एक सन्मानाचा शिरपेच तुरा खोवल्या गेला आहे.

श्री.भुजबळ यांना पुरस्कार जाहीर करून सकारात्मक विचारसरणीचाच अप्रतिम मिडियाने गौरव केला आहे.

प्रकाश कथले

– लेखन : प्रकाश कथले. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

15 COMMENTS

  1. आपणांस पुरस्कार मिळाल्र्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अशीच आपली व आपल्या वेबपोर्टलची उत्रो्तर प्रगती होवो हीच मनीषा. 💐💐💐💐🙏💐💐💐💐

  2. नमस्कार.
    आपल्या दिलखुलास प्रतिसादामुळे माझा काम करण्याचा हुरूप
    नक्कीच वाढेल.
    मन:पूर्वक आभार.

  3. 🌹माननीय श्री. भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

  4. भुजबळसर व त्यांचे कुटुंब सर्वांचे मनापासून अभिनंदन ! कसलाही मोह न करता जनसेवेचा विचार करणाऱ्या व्यक्ती खूप कमी असतात.
    तुमच्यासारख्या पत्रकाराचा गौरव अभिमानास्पद आहे. तुमचे कार्य खूपच कौतुकास्पद व आदरणीय आहे.
    खूप खूप अभिनंदन !!!

    सौ.वर्षा भाबल.

  5. माननीय भुजबळ साहेबांचे चौथा स्तंभ पुरस्काराने यथोचित गौरव झाला आहे. प्रयोगशीलता, नाविण्याचा हव्यास आणि सहजसुलभता ह्या नैसर्गिक गुणांमुळे यापुढेही त्यांच्या प्रकाशनात वैविधता मिळेल याची खात्री आहे.
    भुजबळ सरांचे पुनःश्च अभिनंदन 🙏… श्रीकांत द. चव्हाण

  6. मा.देवेंद्रजी भुजबळ यांना मिळालेला पुरस्कार हा त्या पुरस्काराची उंची वाढवणारा आहे.
    मा.भुजबळ साहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन सर!!!!!*****!!!!!

  7. मन:पूर्वक अभिनंदन देवेंद्र सर 💐💐 तुम्ही अंगीकारलेल्या या व्रतामध्ये तुम्हाला घरातल्या सभासदांची साथ मिळते आहे हे विशेष आहे… निरनिराळ्या विषयांवरील लेख, माहिती देणारं हे वेब पोर्टल सर्वश्रेष्ठ व्हावं, आदर्श वस्तुपाठ व्हावं हीच सदिच्छा 🙏

  8. मनापासून अभिनंदन, देवेंद्र साहेब…! सगळ्या बाजूंना निराशात्मक गोष्टींचा अंधार दाटलेला असताना, आपण जी सकारात्मक विचारांची मशाल पेटवलीत, त्या मशालीच्या उजेडाला मिळालेली दाद, म्हणजेच आपल्याला मिळालेला हा ‘ चौथा स्तंभ’ पुरस्कार आहे… !
    आपल्या आगामी वाटचालीसाठी गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा …!
    .. प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

  9. खरोखरच वाखाणण्यासारखीच कामगिरी…
    देवेंद्रजी मनापासून अभिनंदन!!

  10. माननीय भुजबळ साहेब ,मनापासून अभिनंदन. पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.

  11. श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब आपणास पत्रकारितेत अत्यंत मानाचा समजला जाणारा “चौथास्तंभ पुरस्कार ” मिळाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा