रेडिओ विश्वास या इंटरनेट रेडिओ वरून ‘आजचे पाहुणे’ या सदरात दर शनिवारी मान्यवरांच्या मुलाखती प्रसारित होत असतात. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय असून कार्यक्रमाचे श्रोते केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून जगभर आहेत.
आज, शनिवार दिनांक १८ जुलै दुपारी १ वाजता रेडिओ विश्वास च्या आजचे पाहुणे‘ या कार्यक्रमात यावेळी
न्यूजस्टोरीटुडे’ या लोकप्रिय वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. रात्री १० वाजता त्या मुलाखतीचे पुन्हा प्रसारण होईल. या मुलाखतीत, देवेंद्र भुजबळ यांनी १० वी नापास ते माहिती संचालक पदापर्यंतचा जीवनसंघर्ष मनमोकळेपणाने उलगडलाय.
नाशिक येथे मुख्यालय असलेल्या रेडिओ विश्वास च्या समन्वयक एकपात्री कलाकार, लेखिका मेघना साने या असून त्या कार्यक्रमाच्या संवादकही आहेत.
अमेरिका, इंग्लंड आणि अन्य देशांमधील मराठी माणसांना देखील या मुलाखती ऐकता याव्या म्हणून मुलाखतींचे प्रसारण दोन वेळा होते. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता आणि रात्री १० वाजता होईल.
अमेरिका, जर्मनी, इंग्लंड येथे मराठी साठी काम करणाऱ्या अनेक कार्य कर्त्यांच्या मुलाखती आजचे पाहुणे या सदरात प्रसारित झाल्या आहेत.
हा कार्यक्रम ऐकण्यासाठी play store war click करून rediovishwas 90.8 type kara किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऐका.
https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
ही मुलाखत नक्की ऐकून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
– टीम एनएसटी 9869484800
माननीय देवेंद्र भुजबळ सरांची मुलाखत मला एैकता आली नाही. खुप प्रयत्न करूनहि मला रेडीयोची लींक उघडणे जमले नाही. बाकी सर्वांची प्रतिक्रिया वाचून त्याचा जास्त खेद वाटतोय. मुलाखत खुप सुंदर रंगली व त्यांनी दिलेला बहुमोल सल्ला मला आवडला. त्यांनी सुरू केलेली वेबपोर्टल, “न्युज स्टोरी टुडे”, ला भरघोस यश येवो ह्या माझ्या सदिच्छां. या वेबपोर्टलमुळे मला व माझ्या सारख्या सर्वांना उत्तम लिखाण वाचनाची संधी तर मिळतेच शिवाय त्यांचे स्वत:चे लिखाण वाचकांपर्यंत पोचवता येते. ही संधी त्यानी दिल्याबद्दल मनापासून खुप खुप आभार.
माननीय देवेंद्र भुजबळ सरांची,प्रेरणामय मुलाखत म्हणजे, अनुकरण व सकारात्मक दृष्टी ठेवून आयुष्याला वळण देणारी आहे.त्यांचे भाष्य व्यक्तव्य खिळून ठेवणारे जाणवले. आजच्या तरुण पिढी करीता सरांच्या जीवन शैलीतून धडा घेण्या सारखा आहे. अपयशाने खचून न जाता, नव्या चैत्यन्याने व जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयास, हिंमतीचा व ध्येयवादी आहे. मुलाखतीत त्यांनी दिलेला एक संदेश,म्हणजे कुणावर अवलंबून न राहणे, स्व बळावर पुढे जाणे. स्वार्थ व परमार्थ यांची सांगड कशी असावी? ह्याचे स्पष्ट व अचूक स्पष्टीकरण, सरांनी मुलाखतीत मांडले.खडतर जीवन समोर असताना,त्यांच्या आईची इच्छा डोळ्यासमोर ठेवून, इथपर्यंतचा पल्ला सरांनी गाठला. अनेक परीक्षांच्या पायऱ्या पार करत, तुम्ही उतुंग शिखर गाठलेत.मोठ्या मनाने सामाजिक कार्याना आपले कर्तव्य मानलेत.तुमच्या हया प्रवासास सलाम!पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा! आनंदात जगा व जगू दया. हया तुमच्या संदेशातून खूप काही शिकण्या सारखे आहे.
“विश्वास रेडिओ” वाहिनीचे मनःपूर्वक आभार!
धन्यवाद!
जीवन जगण्याची कला अतिशय उत्तम रीतीने सांगितली आहे.. खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏 आम्हाला अभिमान आहे आपल्या कर्तृत्वाचा 🙏🌴💐
आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांची ‘रेडिओ विश्वास’ मधील प्रेरणादायी मुलाखत ऐकायचे भाग्य लाभले. जीवनातील अनेक संघर्ष त्यांनी उहापोह न करता उत्तम यशस्वीपणे पार केले. वेगवेगळ्या श्रेत्रातून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण काम केले. मेहनत व विश्वास या जोरावर माणूस उच्च पदावर काम यशस्वी करू शकतो. प्रत्येकात स्वार्थ व परमार्थ असला पाहिजे. ‘वेब पोर्टल’ मुळे बारिक सारीक समाजोपयोगी गोष्टी कळतात व काही दिग्गज व्यक्तींच्या
कामाची ओळख होते. तुमच्या प्रत्येक उपक्रमात तुम्हाला यश लाभो. समाजाचे काही ऋण असतात याची जाणीव करून दिली. आनंदात जगा व जगू द्या हा मोलाचा सल्ला दिला.
श्री देवेंद्र भुजबळांचा परिचय करून दिल्याबद्दल ‘रेडिओ विश्वास’ या वाहिनीचे आभार.
धन्यवाद!
भुजबळ साहेबांची मुलाखत आम्ही रेडिओ विश्वास वर नक्कीच ऐकणार आहोत..
हो, मी पण नक्की एैकणार.
कोरोना काळात नवीन ऊर्जा देणारे कार्य, भुजबळ सर करत आहेत. त्यामुळे अनेक मने उल्हासित होत आहेत. नक्की ऐकू.
अरे वा… भुजबळसरांची मुलाखत ऐकायलाच हवी! या लॉकडाउनच्या अस्वस्थ मनस्थितीमध्ये मनाला उभारी येईल असे, खूपच सकारात्मकता देणारे काम ते करत आहेत!
खूप छान मेघना🌷
हो नक्की…मुलाखत ऐकणार