जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय रायगड अंतर्गत उरण येथे नुकत्याच झालेल्या फुटबॉल खेळाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरा दरम्यान द्रोणागिरी डोंगरावर एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
त्यात सहभागी झालेल्या सर्व पालक व विद्यार्थ्यांनी द्रोणागिरी डोंगरावर साफ सफाई करून सफलतापूर्वक पर्यावरण जनजागृतीचा एक चांगला संदेश समाजाला दिला.
या बरोबरच सर्वांनी पोस्टर द्वारे विश्व हिताचे महत्वपूर्ण संदेश दिले. प्रत्येकाने रोजच्या जीवनात प्लास्टिकचा वापर टाळणे हे खूप गरजेचे आहे, या विषयी प्रबोधन करण्यात आले.
रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व सचिन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक व सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमी उरणचे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे, नंदिनी प्रवीण तोगरे , समस्त विद्यार्थी व पालकांनी मिळून हा उपक्रम यशस्वी केला.

– लेखन : विठ्ठल ममताबादे. उरण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम.
👌👌👌👌