Tuesday, September 16, 2025
Homeलेखधगधगता युवा...

धगधगता युवा…

तारुण्य हे ऊर्जेने भरलेले असते. ह्या प्रचंड उर्जेचे योग्य नियमन करण्याची जबाबदारी सरकार, समाज आणि प्रत्येक नागरिकांची आहे. आज जागतिक लोकसंख्येच्या १६ टक्के संख्या तरुणांची आहे.
ह्या ताकदीला गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची. जगाचा आवाज बनण्याची क्षमता त्यांच्यात आहे. असे असताना आजचा युवक प्रचंड अवस्थ आहे. त्याची अनेक कारणं आहेत. जर आज त्यांना योग्य मार्गदर्शन मिळून प्रगतीसाठी मार्ग उपलब्ध करून दिला नाही, तर जग विनाशाकडे. जाईल. आजच्या युवकाला काय पाहिजे ह्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.

नुकतेच नेपाळमध्ये काय घडले, ते आपण पाहिले आहे. आज बहुसंख्य देशात भ्रष्टाचार करणारे नेते, कर बुडवणारे व्यावसायिक, गडगंज श्रीमंत असून आपल्या घरातल्या युवकांना मदत न करणारे नातेवाईक, मित्र, आप्त सगळीकडे दिसतात. बहुतांश लोकांच्याकडे असलेली संपत्ती ही वाम मार्गाने मिळवलेली आहे. पुढच्या सात आठ पिढ्या काही काम न करता बसून खातील इतकी माया ह्यांनी जमवली आहे.

दुसरीकडे कष्ट घर संसार चालवणारी सर्व सामान्य जनता आहे. शिक्षण, आरोग्य, सरकार, शेती, व्यवसाय अश्या सर्व अत्यंत महत्वाच्या गोष्टीही भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. पैसे दिल्याशिवाय एकही काम होत नाही अशी परिस्थिती आहे. सामान्य नागरिकांची हक्काची गोष्ट मिळवण्यासाठी त्यांना लाच द्यावी लागते.

संपूर्ण जगात वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी निर्माण झाली आहे. कुठलाही देश घ्या, राजकीय नेते, व्यावसायिक, सरकारी अधिकारी, न्याय व्यवस्था सगळे भ्रष्ट आहे.

भारत तर भ्रष्टाचारात सर्वात जास्त पुढे आहे. कायद्याचा धाक नसलेला एकमेव देश भारत असेल. तरुण मुलांना ही व्यवस्था मंजूर नाही आहे हे लक्षात घ्या. तरुण पिढीला वाटते प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेनुसार त्याला संधी मिळावी. प्रत्येकाने टॅलेंट वर मोठं व्हावं. काहीही हुशारी नसताना, घराणेशाहीवर मोठे झालेल्या व्यक्तीची टर उडवण्यात ते मागे पुढे बघत नाहीत. गरजू, शारीरिक, मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींना ते मैत्रीत सहज सामावून घेतात.

ह्या तरुण मुलांचं राजकीय, गुंडगिरी, व्यसन, शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करणारी मोठी लाॅबी काम करत आहे. माझ्या मुलांच सगळ ठीक आहे, इतरांच काय करायचं, ही वृत्ती आपण थांबवली पाहिजे. खूप काही नाही तरी थोडेफार जे काही करू शकतो, ते करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे ह्या तरुणांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. औद्योगिक, आर्थिक, कला, क्रीडा, शिल्प, वास्तू, पौराणिक कला, वादन, गायन, नृत्य, शिक्षण इ अनेक मोठे हब निर्माण केले पाहिजेत.
त्यांच्या मधली शक्ती, बुद्धी, हुशारी चांगल्या गोष्टीकडे वळवली, तर व्यसन, गुन्हेगारी आणि समाजाला घातक असणाऱ्या गोष्टींपासून दूर नेण्यास आपण यशस्वी होऊ शकतो.

आज गरज आहे एकजुटीची. राजकीय, आर्थिक फायद्यासाठी एकत्र येणाऱ्या सर्वांना विरोध करून, तरुणांच्या भल्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी एकत्र येणाऱ्या नेत्यांची साथ दिली पाहिजे. आपण आंधळ्यासारखे डोळ्यावर पट्टी बांधून मला काय त्याच? करत बसलो आहोत. नेपाळ मधल्या तरुणांनी दाखवून दिलं आहे, ते काय करू शकतात.
त्यांची शक्ती विघातक कार्यात गुंतवण्यापेक्षा, विधायक कार्यात गुंतवली जावी, असे फार तीव्रतेने वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच..l

प्रतिभा चांदूरकर

— लेखन : प्रतिभा चांदूरकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ओझोन ओझोन….

हलकं फुलकं

झेप : ३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments