Thursday, June 19, 2025

धडपड

मूठ घट्ट धरून ठेवण्याची कुठली ही धडपड, कशासाठी ?
वाळू तर कधीच निसटून गेली आहे.

मग उरलंय काय ?
अनेक वर्षांपूर्वीची शिळी हवा.
काय साध्य होणार ती हवा पकडून ठेऊन ?
हि कसली अनामिक भीती तिला सोडून देण्याची ?

नसेल पटत तर डोकावून बघ, बोटांच्या फटीतून
उरलंय का काही आत ? नाही ना ?
सैल कर ती बोटं, मोकळा श्वास घे.
जुनं सोडून दिलं नाही तर नव्यासाठी जागा कशी होणार ?

वाळलेल्या फुलांची माती झाली
पण इतक्या वर्षांत अगणित फुलं फुललीत
हातात जागा आहे का नव्या फुलांसाठी ?

ती तर जुन्याच मातीने भरली आहे
मिळून जाऊ दे तिला तिच्या जन्मदात्या धरतीत

गंध घे नवीन फुलांचा श्वास भरून
शिळ्या हवेच्या वासावर किती वर्ष जगणार ?

गायत्री गद्रे

– रचना : गायत्री गद्रे, कॅनडा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments