व्यथा अशी ही, कुणास सांगू,
मी पण, विसरत नाही,
अजुन मन, पुरते हरपत नाही..!!!
संसारातील चित्त ही चतूर,
नाती म्हणती कर्मे तू कर,
किती करू तरी, अपूर्ण केवळ,
चिंता संपत नाही…!!!
ऊद्वेगाने शब्द ऊमटती,
भाववेग ते मनी दाटती,
संभ्रम केवळ राहून चित्ती,
शांती नांदत नाही…!!!
वाटे सारे हे संपावे,
आनंदाने मी वर्तावे,
नामातच ते मनही विरावे,
समाधी साधत नाही…!!!
म्हणून स्मरावे गुरूच्या चरणा,
सोडून द्यावा आतील बाणा,
होई भक्तीतून शहाणा,
गुरू मग, धावत येई…!!!

– रचना: हेमंत भिडे. जळगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800