समर्थ रामदास स्वामी जेव्हा प्रथम नाशिक जिल्ह्यातील आगर टाकळी येथे आले त्यावेळी नंदिनी नदीचे पाणी नक्कीच स्वच्छ व पिण्यालायक असेल. आज नंदिनीचे पाणी अस्वच्छ, फेसयुक्त, प्रदूषित झालेले दिसत आहे. नंदिनीचा गोदावरी नदीशीही संगम आहे.
प्रत्येकच नदीचे पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त झाले पाहिजे. नद्यांमध्ये टाकली जाणारी घाण, केमिकल्स याला प्रतिबंध झाला पाहिजे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक अशा सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने नंदिनीचे पाणी पुन्हा स्वच्छ, सर्वाना पिण्यायोग्य झाले पाहिजे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ, पर्यावरणतज्ञ, मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिहजी यांनी व्यक्त केली.
त्यांनी नुकतीच आगरटाकळी येथे श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठाला तसेच नंदिनी नदीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.
जलतज्ञ राजेश पंडित यांनी नंदिनी बाबतची माहिती देऊन नंदिनीला स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी काम करू असे सांगितले.
भाजपा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव सावजी यांनी टाकळी स्थान महात्म्याबद्दल माहिती दिली. सर्वच नद्या आणि नंदिनीची स्वच्छता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोमय मारुती देवस्थान तर्फे मा. राजेंद्रसिहजी, राजेश पंडित, लक्ष्मणराव सावजी, नगरसेवक अनिल ताजनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
गोमय मारुती देवस्थानचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर,
अॅड. भानुदास शौचे, सौ अर्चना रवींद्र रोजेकर, तसेच समर्थ भक्त बांधकाम व्यावसायिक रवींद्र रोजेकर, अमोल शौचे, गंधाली रोजेकर, व्यवस्थापक दत्तात्रय जुन्नरे, पुजारी रमेश कुलकर्णी सौ कुलकर्णी उपस्थित होते
गोदाप्रेमी देवांग जानी यांनीही नंदिनीच्या स्वच्छतेसाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
– टीम एनएसटी. 9869484800