निर्झर नूतन
निर्मळ पावन
मिरवित आनंद केतन
दुडुदुडू धावत जाई …..
डोंगर उतरणी
उतरत मनहरणी
पार करत अडचणी
गाणे हासत गाई …..
संगीसाथी भेटले
नदीरुप घेतले
पुढेपुढे वाहू लागले
कशाची हिला घाई ? …..
अंगणी उतरे
तरंगिणी लहरे
प्रवाह जोर धरे
संथ वहा ऽ कृष्णामाई ….
— रचना : विजया केळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

नमस्कार आणि खूप धन्यवाद