मराठीतील बोली भाषांना प्राधान्य देण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. प्रसिद्ध लेखक, कवी, अभिनेते अजय बिरारी यांची अहिराणी तील कविता आज नवं वर्ष दिनी ….
काय शे त्याम्हान आवढं म्हने वन नवं साल
सरी गय जूनं साल कोन्ही मजा कोन्हा हाल
सूर्य देस परकाश रातके दखातस तारा
परतेक सालना महिना बरबर भरतस बारा
जानेवारीम्हान पडस थंडी एप्रिलमझार ऊन
पानकळा येवाकरता दखनाच पडस जून
सालना पहिला रोज मोठा करतस ठराव
तमाखू बिडी दारुना सोडी दिसुत सराव
पैसा उडावतस हाटेलम्हा सालभर र्हास मजा
तरीबी नवा सालना काबरं गाजावाजा
सालनं काय ली बठनात परतेक रोज ऱ्हास नवा
नवीन वरीजनी पार्टीना कसाले करतस कावा
नवा सालना ठराव, करा दिनदुबळासनी शेवा
आनन्द भेटई तुम्हले आणि लोक करतीन हेवा
सांगता येत नही कहीन वाजी आपला ढोल
करी ल्या पुण्यनी कमाई जिंदगी शे अनमोल

– रचना : अजय बिरारी