Thursday, February 6, 2025
Homeबातम्यानवजीवन प्रतिष्ठान : वनश्री पुरस्कार

नवजीवन प्रतिष्ठान : वनश्री पुरस्कार

अहमदनगर येथील नवजीवन प्रतिष्ठान या संस्थेस रोपनिर्मिती, वृक्षलागवड व वनीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांच्या कल्याणार्थ पर्यावरण जनजागृती कार्याबद्दल सेवाभावी संस्था संवर्ग नाशिक विभागात 2019 चा द्वितीय क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राऊंड नाशिक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचेहस्ते प्रदान करण्यात आला. 30,000 रुपये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाबार्डचे शिलकुमार जगताप, सामाजिक वनीकरणचे दिलीप जिरे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकांत तोडकर, होगणास इंडियाचे डॉ.शरद मगर, कमिन्सचे श्रीराम परांडकर यांनी संस्थेचे अभिनंदन केले.

परिचय
नवजीवन प्रतिष्ठान हि संस्था 1994 पासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जल, जंगल, जमीन, जनावरे व जनता याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने कमिन्स इंडिया फौंडेशन आणि नाबार्ड बँकेच्या आर्थिक सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव येथे वातावरणातील बदलावर आधारीत एकात्मीक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत सुमारे 25,000 दुर्मीळ व औषधी झाडे लावली असुन त्याद्वारे निसर्गसंवर्धनाचे पथदर्शी कार्य सुरु आहे.

भविष्यकाळात नगर तालुक्यातील प्रत्येक गावात घनवन प्रकल्प, देवराई व मियावॉकी फॉरेस्ट याद्वारे निसर्ग संवर्धनाचे कार्य करण्याचा संस्थेने संकल्प केला आहे.

यावेळी नवजीवनचे अमित गायकवाड, उदय पवार, विशाल कदम, अमोल खंडागळे, महेंद्र वामन आदी उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी